आजाराला कंटाळून आत्महत्या केल्याचे निष्पन्न
मुंबई ;- राज्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक आणि माजी एटीएस प्रमुख हिमांशू रॉय यांनी आपल्या दीर्घ आजाराला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना घडली असून कॅन्सर या आपल्या दुर्धर आजाराला कंटाळून त्यांनी स्वतःवर गोळी झाडून घेतली. त्यानंतर त्यांना तातडीने बॉम्बे रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तिथे त्यांना मृत घोषित करण्यात आले. सह पोलीस आयुक्त म्हणून त्यांची कामगिरी वाखाणण्याजोगी होती. दोन वर्षांपूर्वी त्यांना कॅन्सर अर्थात कर्करोगाने ग्रासले. त्यातून ते बरे होत होते मात्र नैराश्यातून त्यांनी आत्महत्या केल्याचे समजते आहे.
१९८८ च्या बॅचचे ते आयपीएस अधिकारी होते. सेंट झेविअर्स या महाविद्यालयातून त्यांनी शिक्षण घेतले. ते मूळ राजपूत होते. २०१३ मधील आयपीएल स्पॉट फिक्सिंग आणि बेटिंग प्रकरणी त्यांच्या तपासामुळेच विंदू दारा सिंगला अटक झाली होती. नंतर त्याची जामीनावर सुटका झाली.
गुन्हे विभागामध्ये काम करताना सगळ्यांना जपणारा, सहकाऱ्यांना मोकळिक देणारा व बॉडी बिल्डर ऑफिसर अशी हिमांशू रॉय यांची ओळख होती. फिट राहण्यासाठी अत्यंत मेहनत रॉय घ्यायचेस परंतु दुर्दैवानं त्यांना दुर्धर आजार झाला होता, आणि त्यांनी विमनस्क होऊन आत्महत्या केल्याचं सांगण्यात येत आहे.