भुसावळ, लोकशाही न्यूज नेटवर्क
ऑर्डनन्स फॅक्टरी भुसावळ येथे दिनांक 15 ऑगस्ट 2021 रोजी स्वतंत्रता दिवसा निमित्त प्रशासनिक इमारती समोर ध्वजारोहन ऑर्डनन्स फॅक्टरीचे महाव्यवस्थापक वसंत निमजे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी त्यांनी उपस्थितांना निर्माणीच्या वर्तमान आणि भविष्या बद्दल अनमोल मार्गदर्शन केले.
डी.एस.सी.जवान, फायर ब्रिगेड आणि सुरक्षा कर्मचारी यांनी अप्रतिम मार्च पास्ट केले. यावेळी ऑर्डनन्स फॅक्टरी चे महाव्यवस्थापक श्री. वसंत निमजे यांच्या शुभहस्ते निर्माणी मधील सर्वउत्कृष्ट कामकाज करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचारी यांचा विशेष पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. तसेच दहावी आणि बारावी ला चांगले गुण प्राप्त करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या मुलांनी विशेष पुरस्कार देऊन गौरवण्यात आले व त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी प्रमुख उपस्थिती महिला कल्याण समिती अध्यक्षा श्रीमती वैजयंती निमजे व त्यांची सर्व कमिटी पदाधिकारी, तसेच अपर महाव्यवस्थापक राजीव कुमार व नीलाद्री विश्वास, सर्व वरिष्ठ अधिकारी, जे.सी.एम.थ्री सदस्य, जे.सी.एम.फोर्थ सदस्य, सर्व युनियन असोसिएशनचे पदाधिकारी, कार्यसमिति सदस्य यांची विशेष उपस्थिती लाभली.