स्वच्छता ठेक्याचा विषय महासभेत गाजणार

0

जळगाव :- शहरातील घनकचरा व्यवस्थापन अंतर्गत महानगरपालिका प्रशासनाने महासभेत वॉटर ग्रेस प्रॉडक्टस, नाशिक या कंपनीला स्वच्छतेचा एकमुस्त ठेका देण्याचा प्रस्ताव विचाराधीन ठेवला आहे. सदर प्रस्तावाला सत्ताधार्‍यांतूनच परस्पर विरोध होणार असल्याचे चिन्हे असल्याने हा मुद्दा गाजणार असल्याचे चित्र आहे. सेना- भाजप युती असल्याने शहराच्या हिताच्या दृष्टीने होणारा सेनेचा विरोधही मावळणार आहे.

लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता संपल्यानंतर तब्बल साडेतीन महिन्यांनी महापालिकेची सभा दि. 6 रोजी गुरुवारी सकाळी 11 वा. पालिकेच्या दुसर्‍या मजल्यावरील सभागृहात महापौर सिमा भोळे यांच्या अध्यक्षतेत होत आहे. सदर सभेत 9 प्रशासकीय, 5 अशासकीय प्रस्तावासह 14 प्रस्ताव विचाराधीन आहेत.

एकमुस्त ठेक्याला परस्पर विरोध

घनकचरा प्रकल्पांतर्गत नाशिकच्या वॉटर ग्रेस प्रॉडक्टस या कंपनीला एकमुस्त ठेका देण्याच्या प्रशासकीय  प्रस्तावाला सभागृहात सत्ताधार्‍यांतूनच परस्पर विरोध होणार असल्याचे चिन्हे आहेत. कंत्राटदाराला मनपाची  कोट्यवधीची नवीन खरेदी केलेली वाहने मोफत वापरायला मिळणार आहेत. वाहने वापरण्यास निविदेत केलेले बदल, सदर कंपनीने इतर महापालिकेत केलेले असमाधानकारक काम, मक्ता संपल्यानंतर महापालिकेचे होणारे नुकसान, नुकसानीसाठी जबाबदार मंजूर करणारे सभागृहातील नगरसेवक त्यांना भरावा लागणारा भूर्दंड या विषयांवरुन हा प्रस्ताव  व आयत्या वेळचे विषय महासभेत चांगलेच गाजणार आहेत.

आयुक्तांची पहिलीच सभा

महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. उदय टेकाळे यांची गुरुवारी होणारी महासभा पहिलीच महासभा आहे. तत्कालीन आयुक्त चंद्रकांत डांगे यांच्या बदलीनंतर रूजू झालेले नवे आयुक्त डॉ. टेकाळे यांनी पद्भार स्वीकारल्यानंतर लगेचच लोकसभेची आचारसंहिता लागू झाली होती.

Leave A Reply

Your email address will not be published.