चाळीसगाव (प्रतिनिधी) :- सह्याद्री प्रतिष्ठानच्या उत्तर महाराष्ट्र महिला संपर्कप्रमुख स्मिताताई बच्छाव यांना पुणे येथील ओबीसी फौंडेशन अॉफ इंडिया या संघटनेने आयोजित, केलेल्या जागतिक महिला दिनानिमित्त होणाऱ्या कार्यक्रमात रणरागिणी नॅशनल अवॉर्ड”देण्यात येणार आहे.
सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या कामाबद्दल यांची निवड करण्यात आली आहे. या अवॉर्ड चे वितरण 7 मार्च 2020 रोजी अण्णाभाऊ साठे रंगमंदिर, येरवडा पुणे येथे सकाळी 11:00 वाजता होणार आहे, असे स्वातीताई मोराळे, राष्ट्रीय अध्यक्ष ओबीसी फौंडेशन इंडिया सविताताई बोरुडे, प्रदेशाध्यक्ष स्वातीताई मोराळे सखी मंच.यांनी कळविले आहे.