स्मार्ट विलेज साकेगाव येथे जिल्हास्तरीय स्मार्ट ग्राम समितीकडून पुरस्कारासाठी ग्रा.प.चे सर्वेक्षण

0

भुसावळ (प्रतिनिधी)- तालुक्यातील साकेगाव ग्रामपंचायतीला नुकताच दहा लक्ष रुपयांचा तालुकास्तरीय स्मार्ट ग्राम पुरस्कार प्राप्त झालेला असून आता जिल्हास्तरीय पन्नास लक्ष रुपयांच्या पुरस्कारासाठी ग्रामपंचायत प्रशासनान सज्ज झालेल आहे

दिनांक 10 फेब्रुवारी रोजी जिल्हास्तरीय स्मार्ट ग्राम पुरस्कार निवड समितीने स्मार्ट विलेजसाकेगाव ग्रामपंचायतीला भेट देऊन गावाचे सर्वेक्षण केले. समितीमध्ये अध्यक्ष म्हणून जामनेर पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी श्रीमती कवड देवी मॅडम, विस्तार अधिकारी श्री बैरागी साहेब तसेच श्री राठोड साहेब आदींचा समावेश होता प्रसंगी त्यांच्या ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीने स्वागत करण्यात आले यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती संजय पाटील माजी सरपंच अनिल पाटील, आनंद ठाकरे सुरेश पाटील माणिक पाटील विष्णू सोनवणे नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य कुंदन कोळी सचिन सपकाळे सागर सोनवाल गजानन पवार

गजू कोळी  पप्पू राजपूत  सुभाष सोनवणे  ग्राम विकास अधिकारी श्री खैरनार साहेब सह समस्त ग्रामपंचायत कर्मचारी वर्गाची व ग्रामस्थांची उपस्थिती होती,

साकेगाव ग्रामपंचायत प्रशासनाने तालुकास्तरीय स्मार्ट व्हिलेज पुरस्कार प्राप्त केलेला असून आता जिल्हास्तरीय स्मार्ट विलेज पुरस्कार कडे वाटचाल करीत असताना जिल्हास्तरीय स्मार्ट व्हिलेज पुरस्कार सर्वेक्षण समितीला माजी सरपंच अनिल पाटील आनंद ठाकरे यांनी गाव विकासासंदर्भातील सविस्तर माहिती दिली ग्रामपंचायतीला राज्यस्तरीय व राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त करण्याच्या दृष्टीकोनातून नवनिर्वाचित सरपंच कमिटी कार्य करेल असा विश्वास आलेल्या समितीतील मान्यवरांनी दिला साकेगाव ग्रामपंचायतीने निर्माण केलेल्या पायाभूत सुविधा बघून गटविकास अधिकारी श्रीमती कवड देवी यांनी ग्रामपंचायत प्रशासनाचे कौतुक करून निश्चित  ग्रामपंचायत एक दिवस राज्यस्तरीय नावलौकिक करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला व नवनिर्वाचित सदस्यांना व भावी सरपंच यांना शुभेच्छा दिल्या

Leave A Reply

Your email address will not be published.