Monday, September 26, 2022

स्मार्टफोनचा स्फोट; बालक जखमी

- Advertisement -

बोदवड, लोकशाही न्यूज नेटवर्क

- Advertisement -

अनेकदा स्मार्टफोनचा स्फोट झाल्याच्या घटना आपण ऐकत असतो. यामुळे बॅटरीचा स्फोट होऊन वापरकर्ते जखमी होतात. अशाच एका घटनेत स्मार्टफोनवर गेम खेळत असताना अचानक बॅटरीचा स्फोट झाल्याने १० वर्षीय बालक जखमी झाला आहे.

- Advertisement -

- Advertisement -

चेतन प्रफुल्ल पाटील (वय १०, रा. भुसावळ ता. सुसरी) हा बालक दिवाळीच्या सुटीनिमित्त बोदवड तालुक्यातील शेलवड येथे त्याच्या मामाच्या घरी गेला होता. आज दुपारी मोबाईलवर गेम खेळत असतांना हँडसेटमधील बॅटरीचा अचानक स्फोट झाल्यामुळे चेतनच्या हाताला दुखापत झाली आहे. सध्या त्याला डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

 

 

 

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या