स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांसाठी उद्या कार्यशाळा

0

जळगाव | धरणगाव येथील तहसील कार्यालयाच्या महाराजस्व अभियान अंतर्गत व येथील सक्सेस करिअर मार्गदर्शक प्रबोधिनी यांच्या संयुक्त विद्यमाने ५ डिसेंबरला एक दिवसीय मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. कार्यशाळेचे उद‌्घाटन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते होणार अाहे.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष नीलेश चौधरी राहणार असून प्रमुख अतिथी मार्गदर्शक म्हणून प्रांताधिकारी विनय गोसावी, तहसीलदार नितीनकुमार देवरे, मुख्याधिकारी जनार्दन पवार, पोलिस निरीक्षक जयपाल हिरे, नायब तहसीलदार प्रथमेश मोहोड यांची उपस्थित राहणार असून ते विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभणार आहे. तहसील कार्यालयाच्या सभागृहात सकाळी १० वाजता कार्यशाळा घेण्यात येईल. १० ते ११ वाजेदरम्यान रजिस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण होईल. ११ वाजता उद‌्घाटन होईल. १२ ते ५ दरम्यान दोन सत्रात मान्यवर अतिथींचे मार्गदर्शन लाभेल. कार्यशाळेत विद्यार्थ्यांनी काेराेनाचे सर्व नियमांचे पालन करावे, असे निमंत्रक व सक्सेस क्लासचे संचालक गुलाबराव पाटील आणि लक्ष्मण पाटील यांनी कळवले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.