नवी दिल्ली : भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि BCCIचा अध्यक्ष सौरव गांगुली याला हृदयविकाराचा झटका आला आहे. याबाबतचे वृत्त टाईम्स ऑफ इंडियानं प्रसिद्ध केलं. गांगुलीला कोलकातामधील वुडलँड रुग्णालयात दाखले केले आहे.
शुक्रवारी सकाळी घरी जिममध्ये काही काळ घालवल्यानंतर गांगुलीला अस्वस्थ वाटू लागले. त्यानंतर त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. गांगुलीला ‘कार्डियक अरेस्ट’ सौम्य झटका बसला असून काही चाचण्या केल्यानंतर त्याच्यावर अँजिओप्लास्टी केली जाणार असल्याचे समजते.
भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीला शुक्रवारी (१ जानेवारी) छातीत दुखू लागले. त्यानंतर त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. पीटीआय या वृत्तसंस्थने रुग्णालयातील अधिकाऱ्यांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, गांगुलीची प्रकृती सध्या स्थिर आहे. गांगुलीला किती वेदना होत आहेत हे आम्ही तपासत आहोत. यासाठी काही टेस्ट कराव्या लागतील.