मिस मल्टीनॅशनल 2019 मध्ये निवड झालेल्या सौंदर्यवती मिस इंडिया तन्वी मल्हारा हिचे प्रतिपादन
जळगाव प्रतिनिधी
सौंदर्य स्पर्धेत आवश्यक नाही की तुम्ही सुंदर असलं पाहिजे. तुम्ही बहुश्रृत असायला हवे त्याचप्रमाणे मनाने व विचारांनी सुंदर असायला हवे , असे प्रतिपादन मिस मल्टीनॅशनल 2019 मध्ये निवड झालेल्या सौंदर्यवती मिस इंडिया तन्वी मल्हारा हिने केले.
तन्वी मल्हारा यांची डिसेंबर 2019 मध्ये होणार्या मिस मल्टीनॅशनल 2019 या स्पर्धेत भारताकडून निवड झाली आहे. शुक्रवारी दुपारी त्यांच्या निवासस्थानी त्यांनी पत्रकारांशी हितगुज केले यावेळी त्यांना नेहमीच प्रोत्साहन देणारे त्यांचे वडील आनंद मल्हारा तसेच आई डॉ. नलिनी मल्हारा उपस्थित होत्या.
पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, मी कधीच सुंदर नव्हते सौंदर्य स्पर्धेतही अनेक सुंदर युवती होत्या. माझी त्यात आश्चर्यकारक निवड झाली ती केवळ बहुश्रृत ज्ञानामुळेच. सौंदर्य स्पर्धा जिंकण्यासाठी 40 टक्के सौंदर्य व 60 टक्के बुद्धिमत्ता आवश्यक असल्याचे सांगून मला जिंकून देण्यासाठी शहरातून सर्वात जास्त वोट मिळाले. त्यासाठी तिने जळगावकरांचे आभार मानले. या स्पर्धेसाठी गेली सहा वर्षे 18 वर्षांची असतानापासून खडतर मेहनत घेत आहे. विपश्यना शिबीराचीही मदत झाल्याचे तिने सांगितले. याच वर्षी मिस इंडिया, मिस अर्थसाठी प्रयत्न केला. अंतिम फेरीपर्यंत गेले मात्र जिंकू शकले नाही. पुन्हा नव्या उमेदीने कामाला लागले. तिसर्याच प्रयत्नात यशस्वी झाल्याचे तिने सांगितले. यासाठी एवढी मेहनत घेतली की किताब मिळाल्यानंतर अक्षरश: स्टेजवर कोसळले असते. विशेष म्हणजे एकाच रुममध्ये थांबलेल्या आम्ही तीन मैत्रिणींनी प्रथम, द्वितीय, तृतीय येवून स्पर्धेत जिंकलो असल्याची माहिती तिने दिली.
तर डिसेंबरमध्ये होणार्या स्पर्धेसाठी एक महिन्यांचे अभ्यास शिबीर होणार आहे. त्यात वॉकपासून प्रशिक्षण घ्यावे लागणार आहे. 30 देशाच्या युवती स्पर्धेत सहभागी होणार आहेत. तर तन्वी खूप मेहनत घेत असून गेल्या दोन वर्षांपासून तीने जेवण बंद केले असून ताजी फळे, सुप पित असल्याची माहिती तिच्या आई डॉ. नलिनी मल्हारा यांनी दिली. तिने वाणिज्य शाखेत शिक्षण घेतले आहे. या स्पर्धेसाठी बिकनी घालून वॉक करावा लागतो मिस इंडिया स्पर्धेसाठी त्याला बंदी असली तरी आंतरराष्ट्रीय स्तरावर तशी फेरी होते. मात्र आईवडीलांच्या प्रोत्साहनामुळे ती फेरीही यशस्वी केल्याचे तिने सांगितले. बिकनी राऊंडमुळेच मुली स्पर्धेत भाग घेण्यास नाखुष असतात. मात्र व्यावसायीकतेमुळे व स्पर्धेतील आवश्यक फेरी ती आहे. या फेरीतून शरीराचा बांधा कसा जपला गेला आहे त्याचे परीक्षण केले जाते.
तन्वी राज्यस्तरीय टेबल टेनीस, बास्केटबॉल,राष्ट्रीयस्तर जलतरणपटू आहे. तिला निबंध व कविता करण्याची आवड आहे. मिस दिवा, पुणे 2015, फेमिना मिस इंडिया झारखंड 2019, मिस अर्थ इंडियाची 2019ची विजेती ठरली आहे. दोन शॉर्ट फिल्ममध्येही तिने काम केले आहे. दोन वर्षे नाशिक एफएमवर आरजे म्हणून काम केले आहे. अनेक कार्यक्रमांचे तिने सुत्रसंचालनही केलेले आहे.