भुसावळकरांनी अफवांवर विश्वास ठेवू नये – पोलिसांचे आवाहन
भुसावळ प्रतिनिधी
सोशल मिडीयावर अफवा पसरविणार्यांची गय केली जाणार नाही असा खणखणीत इशारा येथील डीवायएसपी गजानन राठोड यांनी गुरुवारी रात्री 8 वाजता कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत दिला तसेच भुसावळकरानी अफवांवर विश्वास ठेवू नका असे आवाहन केले .
भुसावळ शहर व तालुका पोलिस ठाणे हद्दीत गेल्या काही दिवसांपासून काही अप्रिय घटना घडल्या असून या घटना निंदणीय आहेत मात्र या घटनांसंदर्भात सोशल मिडीयावर विविध फोटो व माहिती टाकून नागरीकांमध्ये अफवा व भीती पसरवण्याचे काम काही लोक करीत असून त्यांच्यावर पोलिस प्रशासनाकडून कठोर कारवाई केली जाणार असल्याचेही पोलिस उपअधीक्षक गजानन राठोड यांनी यावेळी सांगितले. . पोलिस त्यांचे काम योग्य रीतीने करत असल्याने नागरीकांनी कुठल्याही अफवांवर विश्वास न ठेवता पोलिस प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले.
सोशल मिडीयावर पोलिसांचे बारीक लक्ष आहे. नागरीकांनी दहशतीखाली राहण्याचे कारण नाही. कुठल्याही अफवांवर विश्वास न ठेवता आधी शहानिशा करावी. विषेशतः सोशल मिडीयावर पोलिसांचे बारीक लक्ष आहे. आपल्या शहराचे वातावरण कलुषित होणार नाही याची जबाबदारी प्रत्येक नागरीकांची आहे. अनुचित फोटो वा संदेश व्हायरल करू नये,घाबरु नका, भुसावळ शहर सुरक्षित आहे होते व या पुढेही सुरक्षितच राहील, असा ठाम विश्वास व्यक्त करीत नागरिकांच्या पाठीशी पोलिस प्रशासन उभे आहे, यामुळे कोनीही घाबरून न जाता धैर्याने पोलिस प्रशासनाला सहकार्य करावे असेही यावेळी पो उपअधीक्षक राठोड यानी सांगितले .
परिषदेस बाजारपेठ पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक दिलीप भागवत, तालुक्याचे पोलिस निरीक्षक रामकृष्ण कुंभारे व शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक बाबासाहेब ठोंबे उपस्थित होते.