खामगांव (गणेश भेरडे) : खामगांव शहरातील भाजीपाला व्यापाऱ्यांकडून सोशल डिस्टंसिंगचे उल्लंघन होत असून भाजीपाला उत्पादकावर गुन्हा दाखल करण्यात आल्याने पोलीस व नगर पालिका प्रशासनाकडून चोर सोडून संन्याशाला फाशी देण्याचा प्रकार सुरु असल्याची चर्चा होत आहे.
याबाबत सविस्तर असे की, शहरातील भाजीपाला व्यापाNयांवर नगर पालिका प्रशासनाकडून कोणतीही कारवाई न झाल्यामुळे मुजोर झालेल्या गोपाळ नगर भागातील व्यापारी नेहमी स्वत:च्या घरासमोर भाजीपाला हर्रासी भरवित आहे त्यामुळे सोशल डिस्टंसींगचा फज्जा उडत आहे. आज दि. २५ एप्रिल रोजी भाजीपाला उत्पादकांनी स्थानिक घाटपुरी नाक्यावर भाजीपाला विक्रीला आणला असता न. प. उपमुख्याधिकारी सुर्यवंशी, पथक प्रमुख मुंढे, बाळापूरे, राजनकर, रणजीत देशमुख व शिवाजी नगर पोलीस स्टेशनचे हेड कॉन्स्टेबल पाटील यांनी ज्या शेतकNयाला कृषी विभागाने भाजी विक्रीची पास दिली होती त्याची पास जप्त करुन त्याचेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र सोशल डिस्टंसिंगचे उल्लंघन करुन हर्रासी भरविणााNया व्यापाNयावर काहीच कारवाई केली नाही यामुळे चोर सोडून संन्याशाला फाशी देण्याचा प्रकार सुरु असून भाजीपाला उत्पादकांसोबतच नागरिकांमध्ये पोलीस व नगर पालिका प्रशासनाविरुध्द तीव्र रोष निर्माण झाला असून संबंधीत भाजीपाला व्यापाNयावर कारवाई करण्याची मागणी होत आहे.