सोन्या, चांदीच्या दरात मोठी घसरण ; जाणून घ्या आजचा दर

0

नवी दिल्ली : आज सोन्या, चांदीच्या दरात मोठी घसरण पहायला मिळत आहे. सोमवारी 49,143 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झालेले सोने आज 240 रुपयांच्या घसरणीवर उघडले. 48,903 रुपये प्रति 10 ग्रॅमवर उघडलेले सोने आज 300 हून अधिक रुपयांनी गडगडले असून आताचे दर 48850 रुपये प्रति तोळा आहेत.

बाजाराच्या सुरुवातीलाच सोन्याने 48,807 चा स्तर गाठला. सध्या सोन्याच्या दरात 0.60 टक्के म्हणजेच 293 रुपयांची घट झाली आहे. दुसरीकडे जसा सोन्याचा हाल आहे तसाच चांदीचाही झाला आहे. चांदीच्या दरातही मोठी घसरण दिसू लागली आहे. सोमवारी चांदी 66,535 रुपये प्रति किलोवर बंद झाली होती. आज चांदी 304 रुपयांच्या घसरणीने सुरु झाली. चांदीने सुरुवातीला 66,045 रुपये प्रति किलोचा दर गाठला होता. सध्या चांदी 375 रुपयांनी घसरली आहे.

दिल्लीमध्ये सोमवारी सोन्याच्या दरात घसरण झाली होती. सोन्याचा दर 141 रुपयांनी घसरून 48,509 झाला होता. एचडीएफसी सिक्युरिटीजने याची माहिती दिली. शुक्रवारी सोने 48,650 रुपयांवर बंद झाले होते. तर चांदीमध्ये उलट दिसले होते. चांदीच्या दरात वायदा बाजारात मागमी वाढल्याने 70 रुपयांची वाढ झाली होती. मार्च महिन्याची डिलिव्हरी 66,712 रुपये प्रति किलो झाली होती. 11,716 लॉटचा व्यवहार झाला होता.

Leave A Reply

Your email address will not be published.