मुंबई : गेल्या काही दिवसांपासून सोन्या चांदीच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. मात्र झपाट्यानं वाढणाऱ्या किंमतीला आज करकचून ब्रेक लागला आहे. आज सोन्या-चांदीच्या दरात घसरणं झाल्याचं पाहायला मिळत आहे.
आज सोनाच्या आणि चांदीच्या दरात घसरण झाली असून आज 24 कॅरेट सोन्याचा भाव 611 रुपयांनी कमी झाला आहे. तर चांदीचे दर तब्बल 1405 रुपयांनी स्वस्त झाले आहेत. 24 कॅरेट सोन्याचे दर 55 हजार 515 रुपये प्रति तोळा तर चांदीचा दर 73 हजार 608 रुपये किलो आहे.
काय आहेत सोन्या-चांदीचे नवे दर जाणून घ्या
7 ऑगस्ट – 24 कॅरेट सोनं- 56,126, 10 ऑगस्ट- 55, 515
7 ऑगस्ट – 23 कॅरेट सोनं- 55,901, 10 ऑगस्ट- 55, 293
7 ऑगस्ट – 22 कॅरेट सोनं- 51, 411, 10 ऑगस्ट- 50, 852
7 ऑगस्ट – 18 कॅरेट सोनं- 42, 095, 10 ऑगस्ट- 41, 636
तीन दिवसांत दुसऱ्यादा वायदा बाजारात सोन्याच्या दरात घसरण झाल्यानं खरेदीदारांना मोठा दिलासा मिळाला आहे. गणेशोत्सव येत असल्यानं आता सराफ बाजारात सोनं खरेदीसाठी हळूहळू लगबग सुरू होऊ लागली आहे. याच पार्श्वभूमीवर सोन्याच्या दरात झालेल्या घसरणीमुळे आता सोनं खरेदीला पुन्हा चांगेल दिवस येतील असा अंदाज आहे. येत्या काळात सोनं 80 हजारपर्यंत जाण्याची शक्यता असल्याचा अंदाजही सराफ बाजारात व्यक्त केला जात आहे.