नवी दिल्लीः आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोमवारी सोन्या-चांदीच्या किमतींवर दबाव पाहायला मिळाला. सोमवारी मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर कमकुवत सुरुवात झाल्यानंतर सोन्याच्या किमती वाढल्या. एमसीएक्सवरील जून वायदा सोन्याचे भाव 0.30 टक्क्यांच्या वाढीसह व्यापार करत आहे. चांदीच्या दरात घट पाहायला मिळालीय. मे वायद्याच्या चांदीच्या किमतीत 0.7 टक्क्यांनी घसरण झाली.
सोन्याची नवीन किंमत
सोमवारी एमसीएक्सवरील जून फ्युचर्सची किंमत 143 रुपयांनी वाढून 47,496 रुपये प्रति 10 ग्रॅम झाली. जागतिक बाजारात डॉलर कमकुवत झाल्याने सोन्याच्या किमती वाढताहेत.
चांदीची नवीन किंमत
एमसीएक्सवरील मे वायदाची किंमत 333 रुपयांनी घसरून 68,351रुपये प्रतिकिलो झाली.
या महिन्यात सोने 3000 रुपयांनी महागले
डॉलरमधील कमकुवतपणा आणि अमेरिकन बाँडच्या उत्पन्नातील तोट्यामुळे या महिन्यात भारतातील सोन्याचा भाव 44,000 रुपयांवर आला. या महिन्यात 10 ग्रॅम सोन्याच्या किमतीत 3,000 रुपयांपेक्षा जास्त वाढ झाली. देशांतर्गतबरोबरच जागतिक स्तरावर या महिन्यात सोन्याच्या किमतीत वाढ झाली.