मुंबई : आज शुक्रवारी (23 एप्रिल) सोन्या-चांदीच्या किंमती वधारल्या आहेत. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर (MCX), जून वायदा सोन्याच्या किंमतीत प्रति 10 ग्रॅम 0.32 टक्क्यांनी वाढले आहेत. सोन्याप्रमाणेच चांदीच्या भावातही तेजी आली आहे. मे वायदा चांदीची किंमत प्रति किलो 0.25 टक्क्यांच्या वाढीसह व्यापार करत आहे. मागील व्यापार सत्रात सोन्याचे दर 0.83 टक्क्यांनी घसरले होते, तर चांदीचे दर 0.6 टक्क्यांनी खाली आले होते.
सोन्याचा भाव:
मल्टी कमोडिटी एक्सचेंजमध्ये जून वायदा सोन्याची किंमत 82 रुपयांनी वाढून 47,927 रुपये प्रति 10 ग्रॅम झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात स्पॉट गोल्डचे भाव 0.2 टक्क्यांनी वधारून ते 1,787.11 डॉलर प्रति औंस झाले आहेत. या आठवड्यात सोन्यात 0.6 टक्क्यांनी वाढ झाली आहे.
चांदीचा भाव
शुक्रवारी एमसीएक्सवर मे वायदा चांदीची किंमत 171 रुपयांनी वाढून 69,389 रुपये प्रति किलो झाली आहे.
जागतिक बाजारपेठेत अमेरिकेच्या ट्रेझरी यील्ड्समध्ये कमजोरी आणि अमेरिकन डॉलरच्या किंमतीत घसरण झाल्यामुळे सोन्याच्या किंमतीत वाढ झाली आहे. याशिवाय जागतिक शेअर बाजारात देखील घसरण झाल्यामुळे सोन्याला गती मिळाली आहे.
गुरुवारी दिल्ली सराफा बाजारामध्ये सोन्याचे भाव 168 रुपयांनी घसरले आणि प्रति 10 ग्राम पातळीवर 47,450 रुपयांवर बंद झाले. चांदी 238 रुपयांनी वाढून 69117 रुपयांवर बंद झाली.
या महिन्यात 4 हजारांनी महागले सोने
या महिन्यात भारतीय बाजारपेठेत सोन्याच्या किंमतीत 4 हजार रुपयांपेक्षाही जास्त वाढ झाली आहे. जागतिक बाजारपेठेतील रिकव्हरीमुळे सोन्याला झळाळी मिळाली आहे. या महिन्याच्या सुरुवातीस, अमेरिकन बॉन्ड यील्ड्समध्ये तेजीमुळे सोने 44000 त्या स्तरावर पोहचले होते. ज्यामुळे सेप-हेवन एसेटला धक्का बसला होता.