सोन्या-चांदीच्या किंमतींमध्ये वाढ ; जाणून घ्या आजच्या किंमती

0

नवी दिल्ली । सोन्या-चांदीच्या किंमतींमध्ये आज वाढ दिसून आली आहे. परंतु, मागील वर्षाच्या तुलनेत सोन्याच्या किमतीत जवळपास 11500 हजार रुपयांची घसरण दिसून येत आहे. म्हणजेच मागील वर्षाच्या तुलनेत यंदा सोने बरेच स्वस्त झाले आहे. आज MCX वरील सोन्याचा दर तेजीत उघडला. सोन्याच्या किंमती 77 रुपयांच्या वाढीसह 44890 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या पातळीवर ट्रेड करीत आहेत. त्याशिवाय चांदीची किंमत आज 76 रुपयांच्या वाढीसह 66995 रुपयांच्या पातळीवर ट्रेड करीत आहे.

आंतरराष्ट्रीय बाजाराबद्दल बोलायचे झाल्यास येथेही सोन्याच्या दरात तेजी आहे. अमेरिकेत सोने प्रति औंस 1,735.93 डॉलर दराने 4.16 डॉलर वाढीसह ट्रेड करीत आहे. त्याचबरोबर चांदी 0.01 डॉलरच्या घसरणीसह 26.19 डॉलरच्या पातळीवर ट्रेड करीत आहे.

देशाची राजधानी दिल्लीत 24 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 48150 रुपये आहे. त्याशिवाय चेन्नईमध्ये 46100 रुपये, मुंबईत 44,840 रुपये आणि कोलकातामध्ये प्रति 10 ग्रॅम 46,900 रुपये पातळीवर व्यापार होत आहे.

 मंगळवारी दिल्ली बुलियन मार्केटमध्ये सोन्या-चांदीच्या किंमती

दिल्ली सराफा बाजारात मंगळवारी सोन्याच्या भावात प्रति दहा ग्रॅममागे किरकोळ 45 रुपयांची वाढ झाली असून राजधानी दिल्ली मध्ये सोन्याच्या 99.9 ग्रॅम शुद्धतेच्या नवीन सोन्याचे दर आता प्रति 10 ग्रॅम 44,481 रुपये झाले आहेत. त्याचबरोबर चांदीचा भाव 116 रुपयांनी वाढून 66,740 रुपये प्रति किलो झाला.

Leave A Reply

Your email address will not be published.