मुंबई : सराफा बाजारात सोने आणि चांदीच्या दरात सतत चढ-उतार सुरु आहेत. नवीन वर्षाच्या सुरुवातील मात्र सोन्याच्या भाव काहीसा घसरला आहे. तर, चांदीचा दरही प्रती किलोग्रॅममागे घसरला आहे. जळगाव सराफा बाजारात आजचा (1 जानेवारी) सोन्याचा दर 51,480 रुपये प्रति तोळा, तर चांदीचा दर 69,821 रुपये प्रति किलो इतका आहे. सोन्याच्या भावात 28 रुपये तर, चांदीच्या भावात 494 रुपये इतकी घसरण आली आहे. नवीन वर्षाचा मुहूर्त साधून तुम्ही देखील सोने खरेदीचा विचार करत असाल, तर जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचा सोने आणि चांदीचे दर…
गेल्या चार दिवसांतील सोने-चांदी दर
1 जानेवारी
सोने – 51,480 रुपये प्रति तोळा
चांदी – 69,821 रुपये प्रति किलो
31 डिसेंबर
सोने – 51,508 रुपये प्रति तोळा
चांदी – 70,315 रुपये प्रति किलो
30 डिसेंबर|
सोने – 51,407 रुपये प्रति तोळा
चांदी – 69,769 रुपये प्रति किलो
29 डिसेंबर
सोने – 51,418 रुपये प्रति तोळा
चांदी -70,519 रुपये प्रति किलो
मुंबईतील आजचा सोने चांदी भाव
गुड रिटर्न्सच्या रिपोर्टनुसार, मुंबईत आज सोन्याचा दर 49, 930 रुपये प्रति तोळावर पोहोचला आहे. तर, चांदीचा भाव 68 हजार 400 रुपये प्रति किलोवर पोहोचला आहे.
पुण्यातील आजचा सोन्याचा भाव
पुण्यातही आजचा भाव मुंबईतील दरा इतकाच आहे. पुण्यात आज एक तोळा सोन्याचा भाव 49 हजार 930 रुपयांवर पोहोचला आहे. तर, चांदीचा भाव 68 हजार 400 रुपये प्रति किलो इतका आहे.
कोल्हापुरातील सोने-चांदीचा भाव
कोल्हापुरात मात्र, सोन्या-चांदीचा भाव मुंबईपेक्षा वधारला आहे. कोल्हापुरात सोन्याच्या दराने 50 हजार 660 प्रति तोळ्याचा भाव गाठला आहे. तर, चांदीचा भाव 68 हजार 800 रुपये प्रति किलो आहे.
नव्या वर्षात सोन्याचा भाव वधारण्याची शक्यता
गुंतवणूक तज्ज्ञांच्या माहितीनुसार, देशांतर्गत मार्केटमध्ये सोन्याचे दर हा प्रति दहा ग्रॅम 63 हजारपर्यंत पोहोचू शकतो. तसेच, आर्थिक मंदीचा सामना करण्यासाठी जगभरातील मध्यवर्ती बँकांनी व्याज दर देखील कमी केला आहे. कोरोना काळात व्यवसायांना पाठिंबा देण्यासाठी विशेष पॅकेजही जाहीर करण्यात आले. तसेच, दर कपातीला 2019च्या उत्तरार्धात सुरु झाल्याने अनेक गुंतवणूकदार सोन्याकडे आकर्षित झाले आहेत.
सर्वाधिक गुंतवणूक सोन्यात
जगभरातील असंख्य धातूंमध्ये सोन्याला फार जास्त मागणी असते. सर्वसामान्य लोकांपासून विविध गुंतवणूकदारांची नजर ही सोन्याच्या भावावर असते. सोन्यातील गुंतवणूक ही सर्वात सुरक्षित मानली जाते. त्यामुळे अनेकजण वर्षातून एकदा तरी सोने खरेदी करतात. गोल्ड हबने जाहीर केलेल्या सोने खरेदीच्या रिपोर्टनुसार, गेल्या वर्षात म्हणजे 2020मध्ये कोरोना काळात गुंतवणूकदारांनी सोन्याची सर्वाधिक खरेदी केली. 2020मध्ये गुतंवणूकदारांनी तब्बल 1130 टन सोन्याची खरेदी केली. मात्र 2020 या वर्षात सर्वसामान्य लोकांनी केवळ 572 टन सोन्याची खरेदी केली होती.