Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • जंतर-मंतरच्या नावाखाली महिलेवर जबरदस्ती अत्याचार
    • उज्जैनच्या नागचंद्रेश्वर मंदिरात नागपंचमीनिमित्त प्रचंड गर्दी
    • शुल्लक कारणावरून अपहरण करत बेदम मारहाण
    • मुख्यमंत्री फडणवीसांची पंतप्रधान मोदींसोबत बैठक
    • बापरे! शाळकरी मुले थोडक्यात बचावली!
    • नाशिक जिल्ह्यात पुन्हा जाणवले भूकंपाचे धक्के
    • माजी महामंत्री विजय चौधरी यांची पक्षातून हकालपट्टी
    • अखेर नाशिक, रायगडच्या पालकमंत्रिपदाचा तिढा सुटला
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»ताज्या बातम्या»सोने पुन्हा एकदा झालं स्वस्त, पटापट जाणून घ्या 10 ग्रॅम सोन्याचा भाव
    ताज्या बातम्या

    सोने पुन्हा एकदा झालं स्वस्त, पटापट जाणून घ्या 10 ग्रॅम सोन्याचा भाव

    By April 22, 2021No Comments1 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    नवी दिल्लीः जागतिक बाजारातील घसरणीच्या पार्श्वभूमीवर आज सोन्याचा दर (Gold rate today)खाली आलाय, तर चांदीच्या दरात तेजी पाहायला मिळालीय. सराफा बाजारात सोन्याच्या किमतीत 168 रुपयांची घसरण झाली असून, ती प्रति दहा ग्रॅम 47450 रुपयांच्या पातळीवर बंद झाली. एचडीएफसी सिक्युरिटीजने ही माहिती दिली आहे. यापूर्वी व्यापार सत्रात सोन्याचा भाव 47618 रुपयांच्या पातळीवर बंद झाला होता. IBJA वेबसाईटवर उपलब्ध माहितीनुसार, आज सकाळी 999 शुद्धतेच्या सोन्याची किंमत म्हणजे 24 कॅरेट सोन्याचे दर प्रति दहा ग्रॅम 47864 रुपये (Gold rate AM) होते आणि चांदीची किंमत प्रति किलो 69966 रुपये होती.

    चांदी 238 रुपयांनी वाढून 69117 रुपयांवर बंद

    चांदीची किंमत आज तेजी नोंदविली गेली. चांदी 238 रुपयांनी वाढून 69117 रुपयांवर बंद झाली. मागील व्यापार सत्रात चांदी 68879 रुपयांवर बंद झाली होती. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्यावर दबाव आहे. दुपारी 4.30 वाजता जून डिलिव्हरीसाठी सोन्याचा भाव प्रति औंस 1,784.40 डॉलर होता, तो 8.70 डॉलरने घसरला. चांदीमध्येही किंचित घट झाली. यावेळी चांदीची 0.22 डॉलरच्या घसरणीसह प्रति औंस 26.35 डॉलरवर व्यापार करत होती. एका औंसमध्ये 28.34 ग्रॅम असतात.

    MCX वर सोन्याचा डिलिव्हरी दर

    MCX वर सोन्याची डिलिव्हरी किंमतही कमी होत आहे. जूनच्या डिलिव्हरीसाठी सोन्याचा भाव 398 रुपयांनी घसरून 47830 रुपये प्रति दहा ग्रॅम झाला आणि ऑगस्टच्या वितरणासाठी सोन्याचा भाव 404 रुपयांनी घसरून 48100 रुपये प्रति दहा ग्रॅम झाला.

    MCX वर चांदीचा डिलिव्हरी दर

    चांदीबद्दल बोलायचे झाल्यास मे डिलिव्हरीसाठी चांदीचा भाव प्रतिकिलो 621 रुपयांनी घसरून 69717 रुपये झाला आणि जुलैच्या चांदीचा भाव 600 रुपयांनी घसरून 70822 रुपये प्रति किलो झाला.

     

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email

    Related Posts

    नशामुक्त युवा अभियानासाठी समन्वयाने काम करा!

    August 8, 2026

    दिव्यांग निवासी शाळेतील गंभीर अनियमितता!

    August 8, 2026

    विदगाव पुलाजवळ सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर!

    August 8, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif