सोने झालं आणखी स्वस्त ; पाहा आजचा भाव

0

मुंबई : सणासुदीचा हंगाम आता सरला आहे. त्यातच करोना प्रतिबंधात्मक लशींचा एकामागोमाग एक यशस्वी चाचण्या होत आहेत. त्यामुळे गुंतवणूकदारांनी भांडवली बाजाराकडे धाव घेतली आहे. आज बुधवारी मल्टी कमॉडिटी एक्सचेंजमध्ये (MCX) सोन्याच्या दरात किंचित घसरण झाली आहे. त्यामुळे सोने आणि चांदीच्या किमतींमध्ये सलग दुसऱ्या सत्रात घसरण झाली आहे. मागणी कमी झाल्याने आज बुधवारी सोन्याचा भाव १८७ रुपयांनी कमी झाला आहे. चांदीमध्ये ३४५ रुपयांची घसरण झाली आहे.

 

सोन्याचा भाव प्रती १० ग्रॅम ५०५७५ रुपये आहे. त्यात १९१ रुपयांची घसरण झाली आहे. चांदीचा एक किलोचा भाव ६२८९० रुपये असून त्यात ३५८ रुपयांची घसरण झाली आहे. त्याआधीच्या सत्रात सोने ५६ रुपयांनी तर चांदी ३९३ रुपयांनी स्वस्त झाली होती. सध्या कमॉडिटी बाजारात सोने आणि चांदीवर दबाव आहे. मागील आठवड्यात सोने-चांदीमध्ये नफावसुली झाली होती. सोमवारी कमॉडिटी बाजारात संध्याकाळी ५ वाजता ट्रेडींग आयोजित करण्यात आले होते. त्यात सोने दरात ५८६ रुपयांची तर चांदीच्या भावात एक किलोला १०६२ रुपयांची घसरण झाली होती. मात्र बाजार बंद होताना सोने चांदी सावरले होते.

 

goodreturns.in या वेबसाईटनुसार बुधवारी मुंबईत २२ कॅरेट सोन्याचा भाव प्रती १० ग्रॅम ४९९५० रुपये आहे. तर २४ कॅरेटचा भाव ५०९५० रुपये आहे.दिल्लीत २२ कॅरेटचा भाव ४९६६० रुपये असून २४ कॅरेटचा भाव ५४१७० रुपये आहे. कोलकात्यात ग्राहकांना २२ कॅरेट सोने खरेदीसाठी ४९१०० रुपये मोजावे लागत आहेत. तर २४ कॅरेटचा भाव ५४४४० रुपये आहे. चेन्नईत २२ कॅरेट सोने प्रती १० ग्रॅमसाठी ४८०४० रुपये आहे. २४ कॅरेटसाठी तो ५२४२० रुपये आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.