सोने चांदी झाली स्वस्त ; तपासा आजचे नवे दर

0

मुंबई : कोरोना रुग्णवाढ , पुन्हा टाळेबंदीचे संकट आणि भांडवली बाजारातील मोठी पडझड यामुळे कमॉडिटी बाजारातील वातावरण ढवळून निघाले आहे. सोने आणि चांदीमध्ये होणारी घसरण गुंतवणूकदारांसाठी चिंता वाढवणारी आहे. आज सोने ८० रुपयांनी तर चांदीमध्ये ५२० रुपयांनी स्वस्त झाले आहे.

सध्या मल्टी कमॉडिटी एक्सचेंजमध्ये सोन्याचा भाव प्रती १० ग्रॅम ४४७६१ रुपये असून त्यात ९९ रुपयांची घसरण झाली आहे. एक किलो चांदीचा भाव ६४६७२ रुपये असून त्यात ५७३ रुपयांची घसरण झाली आहे.जागतिक बाजारात आज सोन्याचा भाव प्रती औंस १७३४.८१ डॉलर आहे. तर चांदीचा भाव २५.१० डॉलर आहे.

good returns या वेबसाईटनुसार आज गुरुवारी मुंबईत २२ कॅरेट सोन्याचा भाव ४४०३० रुपये आहे. तर २४ कॅरेट सोन्याचा भाव ४५०३० रुपये झाला आहे. दिल्लीत २२ कॅरेट सोन्याचा भाव ४४०७० रुपये झाला आहे. २४ कॅरेटसाठी सोन्याचा भाव ४८०७० रुपये आहे. चेन्नईत २२ कॅरेटसाठी ४२३५० रुपये असून २४ कॅरेटचा भाव ४६२०० रुपये आहे. कोलकात्यात २२ कॅरेट सोन्याचा भाव ४४२८० रुपये असून २४ कॅरेट सोन्याचा भाव ४६८८० रुपये आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.