सोने चांदी घेताय; हॉलमार्क पाहिला.. ? नाही तर होवू शकतो दंड

0

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क 

केंद्र सरकारने देशात सोन्याच्या दागिन्यांवर नवीन ग्राहक संरक्षण कायदा 2019 लागू करण्यात आला आहे. केंद्रीय ग्राहक मंत्रालयाने यावर्षी 16 जूनपासून हॉलमार्क असलेल्या दागिन्यांची विक्री करणे बंधनकारक केले होते.  तसेच ज्वेलर्सना 30 नोव्हेंबर 2021 पर्यंत जुन्या दागिन्यांचा साठ्याला हॉलमार्क करण्याचे स्वातंत्र्य देण्यात आले होते , मात्र आता हा कालावधी संपला आहे. यामुळे BIS म्हणजेच ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स ने देशातील 256 शहरांमध्ये हॉलमार्क नसलेल्या सोन्याचे दागिने बाळगणाऱ्यांवर कारवाई सुरू केली आहे.

केंद्रीय ग्राहक आणि अन्न व्यवहार मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, जेव्हाही ग्राहक सोने खरेदीसाठी जातात तेव्हा हॉलमार्क पाहूनच सोने खरेदी करतात. हॉलमार्क ही एक प्रकारची सरकारी हमी आहे, आणि ती देशातील एकमेव एजन्सी म्हणजेच ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्सद्वारे ठरवली जाते. हॉलमार्क पाहून खरेदी करण्याचा फायदा असा आहे की, भविष्यात जेव्हा आपण ते विकायला जाल तेव्हा आपल्याला कमी किंमत मिळणार नाही.

 ज्वेलर्सना भरावा लागणार दंड

ग्राहक संरक्षण कायदा 2019 नुसार आता ज्वेलर्सना एक लाख रुपये दंड आणि एक वर्ष तुरुंगवास होऊ शकतो, तसेच सोन्याच्या किमतीच्या पाचपट दंड भरावा लागणार आहे.   तसेच सोन्याच्या शुद्धतेबद्दल शंका असल्यास कोणत्याही हॉलमार्किंग केंद्रात जाऊन ते तपासता येईल, देशभरात सुमारे 900 हॉलमार्किंग केंद्र सुरु केले आहेत.

 हॉलमार्क काय आहे ?

दागिन्यांचे  प्रमाणिकरण करण्यासाठी बीआयएस (The Bureau of Indian Standards) ने “हॉलमार्क” पध्दती अंमलात आणली. बीआयएसची स्थापना संसदेच्या Bureau of Indian Standards Act, 1986  (सुधारीत 2016 ) च्या अन्वये झालेली आहे. त्यामुळे बीआयएसला उत्पादन प्रमाणित करणे आणि प्रमाणिकरणाचा आग्रह करण्याचा अधिकार आहे.

बीआयएसच्या निकषांप्रमाणे “सोने आणि सोन्यापासून बनवलेली उत्पादने ” प्रमाणित करणं आता अनिवार्य आहे. हे जरी खरे असले, तरीही सर्वच सोनार किंवा पेढ्या हॉलमार्कचे दागिने बनवत नाहीत. पण हळूहळू सरकारी आग्रह  आणि ग्राहकांची इच्छा या दोन्हीमुळे हॉलमार्क असलेले दागीने सर्वत्र मिळतील.

हॉलमार्कच्या नगावर पाच चिन्हे असातात

१. बीआयएसचा लोगो

२. कॅरेटचा आकडा (उदाहरणार्थ:२२़़K  वगैरे )

३. अ‍ॅसे (परीक्षण) करणार्‍या संस्थेचे चिन्ह ४ घडणावळीचे  वर्ष

५.  सोनार किंवा पेढीचा लोगो

 

Leave A Reply

Your email address will not be published.