सोने-चांदी खरेदी करण्याची उत्तम संधी, वाचा 10 ग्रॅम सोन्याचा भाव

0

नवी दिल्ली : आज सोमवारी कमॉडिटी बाजारात सोने आणि चांदीवर दबाव दिसून आला. तर गुढी पाडव्यासाठी निर्बंध शिथिल करण्याची मागणी सराफा व्यावसायिकांच्या संघटनेने केली आहे. सध्या मल्टी कमॉडिटी एक्सचेंजमध्ये सोन्याचा भाव ४६५०८ रुपये असून त्यात ८५ रुपयांची किंचित घसरण झाली आहे. एक किलो चांदीचा भाव ६६७९४ रुपये असून त्यात १८९ रुपयांची घसरण झाली आहे.

याआधीच्या सत्रात शुक्रवारी चांदीमध्ये देखील मोठी घसरण दिसून आली. एक किलो चांदीचा भाव ६७ हजारांखाली स्थिरावला. बाजार बंद होताना एक किलो चांदीचा भाव ६६९६१ रुपये झाला त्यात ५४० रुपयांची घट झाली. तत्पूर्वी चांदीचा भाव ६६३७१ रुपयांपर्यंत खाली घसरला होता.

Goodreturns या वेबसाईटनुसार आज सोमवारी मुंबईत २२ कॅरेट सोन्याचा भाव ४४७२० रुपये आहे तर २४ कॅरेटचा भाव ४५७२० रुपये आहे. दिल्लीत आजचा २२ कॅरेट सोन्याचा भाव ४५६७० रुपये झाला आहे. २४ कॅरेटसाठी सोन्याचा भाव ४९८२० रुपये आहे. आज चेन्नईत २२ कॅरेटसाठी ४३७८० रुपये तर २४ कॅरेट सोन्याचा भाव ४७७६० रुपये आहे. कोलकात्यात २२ कॅरेट सोन्याचा भाव ४५८७० रुपये असून २४ कॅरेट सोन्याचा भाव ४८५७० रुपये आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.