Sunday, January 29, 2023

सोने-चांदीच्या भावात घसरण ; जाणून घ्या आजचा नवा दर

- Advertisement -

मुंबई:  सोने आणि चांदी दरात आज घसरण झाली आहे. आज कमॉडिटी बाजारात सध्या सोने आणि चांदीच्या दरात अनुक्रमे १६० रुपये आणि ४५० रुपयांची घसरण झाली आहे.

सोन्याचा भाव प्रती १० ग्रॅम ५१५६० रुपये आहे. तर एक किलो चांदीचा भाव ७०४०७ रुपये आहे. गेल्या दोन सत्रात सोने १५०० रुपयांनी तर चांदीचा भाव जवळपास ३००० रुपयांनी वधारला होता. तो आता कमी झाला आहे.

आज जागतिक बाजारात सोन्याचा भाव १९४९.०७ डॉलर प्रती औंस आहे. त्यात कोणताही बदल झाला नाही. याआधी ९ नोव्हेंबर रोजी सोन्याचा भाव १९५२.३६ या उच्चांकी स्तरावर होता. चांदीचा भाव प्रती औंस २७.३९ डॉलर होता.डॉलर इंडेक्समध्ये घसरण पाहायला मिळाली.

- Advertisement -

good returns या वेबसाईटनुसार बुधवारी मुंबईत २२ कॅरेट सोन्याचा भाव ५०३४० रुपये झाला आहे. त्यात मंगळवारच्या तुलनेत २० रुपयांची वाढ झाली. मुंबईत २४ कॅरेट सोन्याचा भाव ५१३४० रुपये आहे. दिल्लीत २२ कॅरेट सोन्याचा भाव ५०१६० रुपये आहे. २४ कॅरेटसाठी तो ५४७१० रुपये आहे. चेन्नईत २२ कॅरेटसाठी ४८५७० रुपये असून २४ कॅरेटचा भाव ५२९६० रुपये आहे. कोलकात्यात २२ कॅरेट सोन्याचा भाव ५०५७० रुपये असून २४ कॅरेट सोन्याचा भाव ५३२७० रुपये आहे.

spot_imgspot_img

हे वाचायलाच हवे