मुंबई : आज 22 रोजी सकाळी सोन्या-चांदीचे दर उघडताच सोन्याचा दर 51 हजाराच्यावर तर चांदीचा दर साठ हजार रुपये पाहायला मिळाला. सोन्याचा दर ५१,१०० रुपये प्रति १० ग्राम एवढा झाला आहे.

सोने-चांदीच्या भावात (Gold-Silver Rate) २२ जुलै २०२० रोजी बरीच वाढ झाल्याचं दिसून आलं आहे. कारण वायदा बाजारात सोन्याच्या किंमती आणखी वाढल्या आहेत. बुधवारी सकाळी बाजार उघडताच सोन्याच्या दरात (Gold Rate) वाढ झाल्याचं दिसून आलं आहे. सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास २२ कॅरेट सोन्याचा होलसेल चा भाव ५११०० रुपये प्रति १० ग्रॅमवर होता. तर आंतरराष्ट्रीय बाजारात जोरदार तेजीमुळे बुधवारी भारतीय वायदा बाजारात चांदीची किंमत प्रति किलो ६०,५०० रुपयांच्या वर गेली आहे.
चांदीची वाढती औद्योगिक मागणी वाढण्याच्या अपेक्षेने किंमती सतत वाढत असल्याचे कमोडिटी मार्केटमधील तज्ज्ञांचे म्हणणे आहे. दरम्यान, याआधी व्यापारादरम्यान, चांदीचा दर ५५,४६५ रुपये प्रति किलो झाला होता. जे की, २०१३ नंतरची ही आजची सर्वोच्च पातळी आहे.
चांदी ही केवळ एक मौल्यवान धातूच नाही तर ती औद्योगिक धातू देखील आहे. याचा उपयोग दागदागिन्यांसह उद्योगात देखील होतो. इलेक्ट्रॉनिक्स आणि छायाचित्रण व्यतिरिक्त इतर अनेक क्षेत्रांतील उद्योगांमध्येही याचा वापर केला जातो.

