सोने-चांदीच्या दरात घसरण ; जाणून घ्या आजचा भाव

1

मुंबई ।  गेल्या दहा दिवसांपासून सोन्याची खरेदी करण्यासाठी ग्राहकांमध्ये गर्दी वाढू लागल्याने सोन्याच्या दरात वाढ पाहायला मिळाली होती. मात्र, आज गुरुवारी मल्टी कमॉडिटी एक्सचेंजमध्ये सोने आणि चांदीमध्ये सकाळपासून घसरण पाहायला मिळाली आहे. आज सकाळी बाजार उघडताच सोने दरात ३३४ रुपयांची घसरण झाली. चांदीमध्ये ८५३ रुपयांची घसरण झाली आहे.

सध्या सोन्याचा भाव ३७६ रुपयांनी घसरला असून तो ५१४४८ रूपये झाला आहे. चांदीचा भाव प्रती किलो ६७८६५ रुपये आहे. त्यात ९१६ रुपयांची घसरण झाली आहे. याआधी बुधवारी सोने ०.१ टक्क्यांनी वधारले होते. मंगळवारी बाजार बंद होताना सोने ३७३ रुपयांनी महागले होते तर चांदीच्या किमतीत ३९० रुपयांची वाढ झाली होती.

goodreturns या वेबसाईटच्या आकडेवारीनुसार गुरुवारी मुंबईत २२ कॅरेट सोन्याचा भाव ५०९५० रुपये आहे. २४ कॅरेटसाठी तो ५१५९० रुपये आहे. दिल्लीत २२ कॅरेट सोन्याचा भाव ५०४१० रुपये असून २४ कॅरेट सोन्याचा भाव ५४९९० रुपये आहे. कोलकात्यात २२ कॅरेट सोन्याचा भाव ५०९१० रुपये असून २४ कॅरेट सोन्याचा भाव ५३६१० रुपये आहे. चेन्नईत २२ कॅरेट सोन्याचा भाव ४९४६० रुपये असून २४ कॅरेट सोन्याचा भाव ५३९६० रुपये आहे.

 

1 Comment
  1. Jay says

    Aree 10000 kami zalay var post kara

Leave A Reply

Your email address will not be published.