Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • दिवाळी पाडवा आणि भाऊबीज : नात्यातील जिव्हाळ्याचा दीपोत्सव
    • ठाकरेंची साथ सोडण्याच्या निर्णयाबाबत निंबाळकरांचे मोठे विधान
    • 15 डिसेंबरपर्यंत शेतातील बोअरवरील बंदी उठविणार
    • कोल्हापुरात गोकुळच्या माजी संचालकांना शिवीगाळ
    • अमेरिकेत ऐन दिवाळी समारंभात गोंधळ
    • दिवाळी : दंतकथांमागील शहाणपण
    • हे पैसे तुमचे आहेत.. मोदीच्या बापाचे पैसे नाहीत!
    • दिवाळी सण उजळला, शेतकऱ्यांमध्ये मात्र अंधार!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • स्किन केअर
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»महाराष्ट्र»सोने आणि चांदीमध्ये घसरण; जाणून घ्या आजचा भाव
    महाराष्ट्र

    सोने आणि चांदीमध्ये घसरण; जाणून घ्या आजचा भाव

    By April 7, 2021No Comments1 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुंबई : कोरोना व्हायरसचा प्रकोप वाढल्याने गुंतवणूकदारांचा थरकाप उडाला आहे. याचे पडसाद भांडवली बाजारात आणि कमॉडिटी बाजारात पडसाद उमटले. आज बुधवारी सोने आणि चांदीच्या दरात किरकोळ घसरण झाली.

    मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर सोनेदरात 0.25 टक्क्यांची कपात झाली. चांदीची किंमत 0.23 टक्क्यांनी घसरली. गेल्यावर्षी ऑगस्य महिन्यात सोन्याचा तोळ्याचा भावा तब्बल 56 हजार 200 रुपये होता. त्यामध्ये आतापर्यंत म्हणजेच एप्रिल 2021 पर्यंत जवळपास 11 हजारांची घट झाली आहे. त्यामुळे MCX नुसार सोन्याच्या आजच्या दरात 115 रुपयांची घट होऊन तोळ्याचा भाव 45,804 रुपयांवर पोहोचला आहे.

    इकडे महाराष्ट्रातील प्रसिद्ध जळगावातील सराफा बाजारात आजचा सोन्याचा भाव 47 हजारांवर पोहोचला आहे. MCX वर सोन्याचा भावात घसरण झाली असली तरी प्रत्यक्ष सराफाजवळ तुम्हाला सोने 47 हजारांच्या आसपास मिळू शकतं. दुसरीकडे जळगावातील चांदीचा किलोचा भाव 67,440 वर पोहोचला आहे.

    सोने दर
    मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर बुधवारी जून वायदा सोनेदरात 115 रुपयांची घट झाली. त्यामुळे 10 ग्रॅम सोन्याचा भाव 45,804 रुपयांपर्यंत पोहोचला. मागील व्यावसायिक सत्रात 1.25 टक्क्यांची तेजी पाहायला मिळाली होती. दुसरीकडे आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किमतीत फारसा फरक पडला नाही.

    चांदीचे दर
    आज MCX वर मे वायदेनुसार चांदीचा भाव 149 रुपयांनी घसरला. त्यामुळे प्रतिकिलो चांदीचा भाव 65,748 रुपयांवर पोहोचला. मागील ट्रेडिंग सत्रात चांदीदरात 2 टक्क्यांनी म्हणजेच तब्बल 1300 रुपयांची वाढ झाली होती.

    कोरोना महामारीच्या चिंतेने सोनेदरात उसळी
    देश पुन्हा एकदा कोरोनाचा कहर झेलत आहे, त्यामुळे वर्षाच्या अखेरीस सोन्याची किंमत 48 हजार रुपयांपर्यंत पोहोचू शकते. मार्चच्या सुरुवातीस सोने 44 हजारांपर्यंत खाली आले होते, परंतु आता पुन्हा किमती वाढल्यात.

    वर्षाअखेरीस सोने 50 हजारांपर्यंत पोहोचू शकते
    केडिया अ‍ॅडव्हायझरीचे संचालक अजय केडिया यांच्या म्हणण्यानुसार, यंदा जूनपर्यंत सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 47 हजार रुपयांपर्यंत पोहोचू शकेल. या वर्षाच्या अखेरीस सोने 48 ते 50 हजारांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. परंतु कोरोना प्रकरणात मोठी वाढ झालीय, तर येत्या काही दिवसांत सोन्याच्या किमतीत वाढ होऊ शकते.

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email

    Related Posts

    ठाकरेंची साथ सोडण्याच्या निर्णयाबाबत निंबाळकरांचे मोठे विधान

    November 8, 2026

    15 डिसेंबरपर्यंत शेतातील बोअरवरील बंदी उठविणार

    November 8, 2026

    कोल्हापुरात गोकुळच्या माजी संचालकांना शिवीगाळ

    November 8, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif