जळगाव, दि. 15-
माणदेशी महिला सहकारी बँक या ग्रामीण स्त्रियांसाठी चालविलेल्या पहिल्या बँकेच्या संस्थापक व अध्यक्षा श्रीमती चेतना गाला सिन्हा यांच्या हस्ते मंगळवार, दि. 13 मार्च 2018 रोजी सोनाळकर्स अकॅडमीमधील अभ्यासिकेचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी शेखर सोनाळकर व सोनाळकरर्स अकॅडमीचे संचालक कबीर वासंती शेखर, वृषाली पाटील व डॉ. मनिष चौधरी आदी मान्यवरांची उपस्थिती होती. विद्यार्थ्यांना शांततेत अभ्यास करता यावा यासाठी सोनाळकर अकॅडमीच्या या अत्याधुनिक अभ्यासिकेची स्थापना करण्यात आली आहे. सदर अभ्यासिकेत विद्यार्थ्यांसाठी सर्व सुविधा उपलब्ध करण्यात आल्या असून शांत वातावरणात एकाग्रतेत अभ्यास करता यावा हाच या अभ्यासिकेमागील मुख्य उद्देश आहे.
श्रीमती चेतना गाला सिन्हा या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या सह अध्यक्षा असून त्यांना अशोका फेलोशिप, येल युनिर्व्हसिटीची फेलोशिप अशा अनेक संस्थांनी सन्मानित केलेले आहे. त्यांच्या शुभहस्ते या अभ्यासिकेचा उद्घाटन सोहळा पार पडला. यावेळी त्यांनी संपूर्ण अभ्यासिकेची पाहणी करून विद्यार्थ्यांसाठीच्या या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक केले. सर्व सोयी सुविधायुक्त असलेली अत्याधुनिक अभ्यासिका विद्यार्थ्यांना लाभदायक ठरणार आहे. तरी अधिक माहितीसाठी सोनाळकर्स अकॅडमी बडोदा बँकेच्या समोर, रिंग रोड, जळगाव येथे संपर्क साधावा असे आवाहन कबीर वासंती शेखर व वृषाली पाटील या संचालकांद्वारे करण्यात आले आहे.