यावल :- काँग्रेसच्या नेत्या प्रियांका गांधी यांना सोनभद्र हत्याकांडातील पीडितांच्या भेटीला जात असतांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. या कारवाईच्या निषेर्धात आज यावल येथे कॉंग्रेसतर्फे मोर्चा काढून तहसीलदार जितेन्द्र कुवर यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी कॉंग्रेसचे जिल्हा सरचिटणीस रामराव बाबुराव मोरे, चंद्रकांत देविदास इंगळे, भरत धनसींग चौधरी, विधानसभा क्षेत्रचे उपाध्यक्ष शेखर पंढरीनाथ तायडे, काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष हाजी गफ्फारशाह, शहराध्यक्ष कदीर खान करीम खान, अंनील निळकंठ जंजाळे, राजु पिंजारी, इमरान पहेवान यांच्यासह महीला आघाडीच्या तालुका भध्यक्ष पुष्पाताई झाल्टे, अनुसुचित जाती जमाती विभागाच्या जिल्हा उपाध्यक्ष चंद्रकलाताई ईंगळे, अशपाक शाह, कैलास सिताराम चौधरी, जयेश चोपडे, मनोहर गुरचळ, प्रविण पाटील, अरूण धना भालेराव, शेख साबीर शेख लाल, आंनद दामु तायडे, अनिल कोळी आदी कार्यकर्त उपस्थित होते.
उत्तर प्रदेश राज्यात भाजप शासनाच्य कार्यकाळ संघटीत गुन्हेगारी वाढल्याचे दिसुन येत आहे. या सर्व घटनेच्या पार्श्वभुमीवर कॉंग्रेसच्या राष्ट्रीय सरचिटणीस प्रियंका गांधी यांच्यावर झालेल्या कारवाईच्या निषेर्धात आज सकाळी ११ वाजता जिनिंग प्रेसिंग सोसायटी पासुन काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष प्रभाकर अप्पा सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली तहसील कार्यालय पर्यंत मोर्चा काढून तहसीलदार जितेन्द्र कुवर यांना निवेदन देण्यात आले.