सोनबर्डी-खडके खुर्द वळणावर दुचाकीच्या अपघातात गारखेडाचा युवक ठार

0

एरंडोल (प्रतिनिधी) :  एरंडोल एम.एच 19 बी.आय 2537 क्रमांकाच्या दुचाकीला बुधवारी पहाटे सोनबर्डी फाटा-खडके खुर्द वळणावर अपघात होऊन सचिन मधुकर पाटील वय पंचवीस वर्ष हा युवक जागीच ठार झाला. हे ठिकाण एक्सीडेंट स्पोट झाला असून या आधी या जागेवर काही अपघात घडले आहेत.

एरंडोल कासोदा रस्त्यावरील सदर वळण काढण्यात यावे या मागणीसाठी कासोद्याच्या ग्रामस्थांनी जवळपास पंधरा ते वीस मिनिटे रास्ता रोको आंदोलन केले पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव व सहाय्यक पोलीस निरीक्षक तुषार देवरे हे घटनास्थळी तात्काळ दाखल होऊन त्यांनी आंदोलन कर्त्याना आश्वासन दिल्यानंतर रास्ता रोको आंदोलन मागे घेण्यात आले दरम्यान दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.

याबाबत एरंडोल पोलीस स्टेशन सूत्रांनी दिलेली माहिती आशिकी सचिन मधुकर पाटील राहणार गारखेडा तालुका धरणगाव वय पंचवीस वर्ष हा तरुण एम एच 19 बी आय 2537 या क्रमांकाच्या दुचाकीने कासोद्या कडून एरंडोलकडे येत असताना सोनबर्डी फाट्यापासून थोड्या अंतरावरील खडके खुर्द कडे जाणाऱ्या  रस्त्याच्या वळणावर पहाटेच्या अंधारात वळण लक्षात न आल्याने दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने दुचाकी बाजूच्या खड्ड्यात जाऊन कोसळली त्यात दुचाकी चालक सचिन पाटील हा जागीच ठार झाला उजेड पडल्यावर सोनबर्डी फाट्यावरील वीट भट्ट्या चालकांच्या अपघात झाल्याचे लक्षात आले त्यांनी त्याबाबत खडके खुर्द पोलीस पाटील चंद्रकांत पाटील यांना कळविले त्यांनी एरंडोल पोलिस स्टेशनला माहिती दिल्यावर पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव व सहाय्यक पोलीस निरीक्षक तुषार देवरे हे त्यांच्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले.

याबाबत एरंडोल पोलीस स्टेशनला अपघाताची नोंद करण्याचे काम सुरू होते. हेडकॉन्स्टेबल विकास देशमुख राजू पाटील हे पुढील तपास करीत आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.