सोनं पुन्हा वधारले ; जाणून घ्या आजचा दर

0

मुंबई : करोनामुळे अमेरिकेत आणीबाणी जाहीर झाली असून तेथील केंद्रीय बँकेने (फेडरल रिझर्व्ह) रविवारी व्याजदरात कपात केली. त्यामुळे कमॉडिटी बाजारात मौल्यवान धातूंची मागणी वाढल्यामुळे आज सोन्याच्या दरात तेजी दिसून आली. आज सोमवारी सोन्याचा भाव ६०० रुपयांनी वाढला.

शुक्रवारी मल्टी कमॉडिटी एक्सचेंजमध्ये (MCX ) सोन्याचा भाव १८०० रुपयांनी गडगडला होता. आज त्यात मात्र वाढ झाली. आज सोने ६०० रुपयांनी वाढले आणि ४० हजार ४६० रुपये झाले. चांदीच्या भावात १ टक्का वाढ झाली. चांदीचा भाव किलोला ४०३९२ रुपये होता.

फेडरल रिझर्व्हने व्याजदर कपात करून तो जवळपास शून्य केला आहे. करोनामुळे नजिकच्या काळात महामंदीची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांनी सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याकडे धाव घेतली आहे. आज जागतिक बाजारात सोने ३ टक्क्यांनी वधारले. जवळपास ४५ डॉलरनी वाढून आज सोन्याचा भाव १५७५.४७ डॉलर प्रती औंस झाला.

 

Leave A Reply

Your email address will not be published.