सैन्य भरती परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटली ; पेपर रद्द

0

पुणे : सैन्य भरती परिक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याप्रकरणी राज्यात दोन ठिकाणी कारवाई करण्यात आली असून पुणे पोलिसांनी या पेपर फोडणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी दोन ठिकाणी समांतर कारवाई केली असून, विश्रांतवाडी पोलिसांनी आतापर्यंत एकूण 3 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुण्यातील बारामती येथेून एकाला अटक करण्यात आलं आहे. अचानक पेपर फुटल्यामुळे देशभरात होणार सैन्य भरतीचा पेपर सरकारला रद्द करावा लागला होता. त्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली.

 

मिळालेल्या माहितीननुसार रविवारी म्हजेच 28 फेब्रुवारी रोजी देशभरात सैन्य भरतीसाठी परीक्षा होणार होती. मात्र, सैन्य भरतीचे पेपर आदल्या दिवशी फुटणार असल्याची खबर पोलिसांना लगली. त्यानंतर सापळा रचून गुप्तचर संस्था आणि पुणे पोलीस दलाच्या गुन्हे शाखेने कारवाई केली. पुणे पोलिसांनी दोन टिकाणी समातंर पद्धतीने चौकशी केली. तसेच एकाला बारामती येथून ताब्यात घेतले. एकूण तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सेवानिवृत्त अधिकऱ्याच्या मुलाने याबाबत तक्रार दिली होती. पुण्यातील विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात एकूण 3 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आला आहेत.

 

नेमका प्रका काय?

देशभरात 28 फेब्रुवारी रोजी सैन्यभरतीसाठी परीक्षा होणार होती. मात्र, पेपर होण्याच्या आदल्या दिवशी पेपर फोडून ते उमेदवारांना पुरविणार असल्याची गुप्त माहिती पोलिसांना समजली होती. त्यानंतर पुणे पोलिसांनी शहरात ठिकठिकाणी छापेमारी केली होती. तसेच, रात्र उशिरापर्यंत पोलिसांचा तपास सुरु होता. सध्या सैन्य भरतीसाठी देशभरात होणारी परीक्षा रद्द करण्यात आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.