चाळीसगाव – जळगाव लोकसभेचे राष्ट्रवादी व काँग्रेस, आघाडी पक्षाचे उमेदवार गुलाबराव देवकर यांच्या चाळीसगाव येथे सकाळी बारा वाजता झालेल्या प्रचाराच्या जाहीर सभेत महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते नामदार धनंजय मुंडे यांनी आपल्या भाषणातून राज्यातील व केंद्रातील भारतीय जनता पार्टीच्या सरकारावर जोरदार आसूड ओढले. सैनिकांच्या नावे मते मागणारे मात्र शहिदांचा अपमान करत आहेत, असा आरोप त्यांनी केला.
त्यांनी आपल्या भाषणात पाच वर्षात सामान्य माणसासाठी व जनतेसाठी एकही हिताचे काम केले नाही,पाचवर्षांपूर्वी मोदी हे देशाचे सपनों का सौदागर म्हणून आलेत, अच्छे दिन,ची स्वप्न दाखवली तरुणांना नौकरीचे आमिषे ,दाखवली.या आश्वासनांना युवकही भायला त्यांना वाटले नोकरी मिळेल आपली सोयरीक होईल आणि माझा संसार सुखाचा चालेल, परंतु या पाच वर्षात युवकांना नोकरी तर सोडाच परंतु बेकारीमुळे त्यांची सोयरीक सुद्धा जमली नाही त्यामुळे तरुणांची आज अवस्था नोकरी पण नाही आणि शोकरी पण नाही, अशी झाली .त्यामुळे नरेंद्र मोदींनी दिलेली स्वप्ने फेल झाल्यानंतर आता आपल्याला जनता विचारेल युवक विचारेल अच्छे दिन, काळा पैसा, नोकर्या, कुठे गेल्यात म्हणून या सर्व प्रश्नांना बगल देऊन भाजपने पुलवामा येथील शहीद जवानांच्या नावे मते मागायला सुरुवात केली .परंतु त्याच वेळी माझ्या महाराष्ट्राच्या शूर वीर शहीद हेमंत करकरे साहेबांचा अपमान करायचा, म्हणजे एकीकडे शहिदांच्या नावाने मते मागायची आणि दुसरीकडे शहिदांचा अपमान करायचा अशा दुतोंडी भाजपवाल्यांना आपण मते देणार का ?असा सवालही त्यांनी सभेत उपस्थित केला. दुसरीकडे जळगाव येथील भाजपचा उमेदवार उन्मेश पाटील यांच्या चाळीसगाव तालुक्यातील आमदार म्हणून साडेचार वर्षाच्या कार्यकिर्ती वर आरोप करताना चाळीसगाव तालुक्यात वाळू चोरी मध्येभागीदारी ,गांजा तस्करी ,बनावट दारू तयार करणे विकणे, गुटखा तस्करी ,तीन चाकी रिक्षा पोलिसांकरवी हप्ता मिळवणे ,एमआयडीसीतील दोघं कंपन्यांमध्ये लावलेल्या कामगारांकडून प्रत्येक महिन्याला हप्ता जमा करणे ,अशा अवैध धंद्यांना प्रोत्साहन देऊन त्यांच्याकडून मलिदा खाणाऱेअसे लोकसभेचे उमेदवार आहेत अशा कर्तुत्ववान उमेदवाराला आपण मत देणार का असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.
यावेळी विधानपरिषदेचे आमदार हरिभाऊ राठोड माजी आमदार राजीव देशमुख काँग्रेस पक्षाचे ओबीसी सेलचे महाराष्ट्राचे उपाध्यक्ष अशोक खलाने यांचीही भाषणे झाली.खासदार ए टी नाना पाटील यांचे साडू समाधान पाटील यांनी यावेळी राष्ट्रवादी पक्षात प्रवेश प्रवेश करून, आपल्या भावना मांडताना जो आताचा उमेदवार उमेश पाटील हा एटी नाना पाटील यांचा हात धरून राजकारणात एन्ट्री केली त्याच नानांचा राजकीय आत्मघात करण्यास सर्वात पुढे होता अशा आत्मघातकी उमेश पाटलाला आपण मत देणार का असा सवाल उपस्थित केला.
व्यासपीठावर माजी आमदार मनीष जैन दिलीप सोनवणे ईश्वर जाधव तसेच रवींद्र भैय्या पाटील अमळनेरचे अनिल भाईदास पाटील रंगनाथ दादा काळे रमेश शिंपी सौ कल्पना पाटील गफूर पैलवान प्रदीप देशमुख काँग्रेस पक्षाचे अनिल निकम प्रमोद पाटील दिनेश पाटील तसेच राष्ट्रवादी आरपीआय व काँग्रेस पक्षाचे नेते व कार्यकर्ते उपस्थित होते या सभेचे सूत्रसंचालन नगरसेवक वक रामचंद्र जाधव यांनी केले.