सेवानिवृत्त जवानाची मनोहर पाटील भव्य मिरवणूक संपन्न

0

भडगाव :- तालुक्यातील भातखंडे येथील भारतीय सैन्य दलातील जवान मनोहर गोरखनाथ पाटील यांनी आपली १७ वर्षे सेवा भारतीय सैन्यदलात केली .मनोहर गोरख नाथ पाटील हे पहिले   नागपूर कामठी या ठिकाणी भरती झाले  एम ए सी पी हवालदार मनोहर गोरखनाथ पाटील हे  9 गाईड रेजिमेंट सेंटर कामठी या ठिकाणी ट्रेनिंग केल्यानंतर तेथून ते हरियाणा व नंतर दक्षिण आफ्रिका येथे शांती सेनेच्या माध्यमातून शांतीदूत म्हणून ते त्या ठिकाणी गेले नंतर उत्तरांचल .पंजाब ,नागपूर .जम्मू .काश्मीर, पुणे ,या ठिकाणी जाऊन नंतर जगातील सर्वात उंच युद्धभूमी सियाचिन ग्लेशियर या ठिकाणी खडतर सेवा त्यांनी केलीे त्या ठिकाणी मायनस डिग्री टेम्परेचर मध्ये त्यांनी काम केलं नंतर ते नागपूर येथे ३० जुन सेवानिवृत्त झाले.

गावी आल्यावर गावात फटाक्याच्या आतीषबाजीने त्यांचे भव्य मिरवणूक काढून गावातील माता भगिनींनी त्यांना औक्षण केले. व   देशभक्तिपर घोषणा देण्यात आल्या व देशभक्तिपर गित सादर  करण्यात आले गावातील विठ्ठल मंदिरावर त्यांचा सेवानिवृत्तीचा सत्कार समारंभ कार्यक्रम करण्यात आला यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा पोलीस पाटील संघटनेचे कार्यकारी अध्यक्ष विलास माणिक पाटील पिंपरखेड हे होते यावेळी  ग्रामपंचायतीच्या वतीने   ग्राम पंचाय तीच्या सरपंच  भागाबाई प्रकाश भील . उपसरपंच  सदस्य व भातखंडे बु व खुर्द ग्रामपंचायत चे ग्रामसेवक चंद्रकांत सोमवंशी नितीन बोरसे  यांनी त्यांचा सपत्नीक भव्य सत्कार करण्यात आला तसेच  विविध संस्थेचे  पदाधिकारी यांनी देखील सत्कार केला .कार्यक्रम प्रसंगी गावातील सुट्टी वर आलेले सैनिक विकास पाटील, माजी सैनिक लक्ष्मण महाजन उपस्थित होते.  सेवानिवृत्त जवान मनोहर पाटील यांचे रांगोळीतुन रेखाटलेले चित्र काढण्यात या कामी राहूल सोनवणे निलशे महाजन यांनी विशेष  परिश्रम घेतले .तसेच विविध संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते. त्यांचे सर्व आप्तेष्ट नातेवाईक मित्रमंडळींकडून देखील त्यांचा वैयक्तिक सत्कार करण्यात आले .यावेळी गावातील शेकडो ग्रामस्थ उपस्थित होते सेवानिवृत्ती चा कार्यक्रम अत्यंत उत्साहपुर्ण वातावरणात संपन्न झाला या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  शिक्षक  बी एन पाटील यांनी केले.

Leave A Reply

Your email address will not be published.