सेवक सेवाभावी संस्थेतर्फे मां जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती साजरी

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

सेवक सेवाभावी संस्थाच्या वतीने मां साहेब जिजाऊ यांची 423 वी व स्वामी विवेकानंदची 159 वी जयंती सेवक सेवाभावी संस्थाच्या कार्यालयात साजरी करण्यात आली.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला भारती काळे, किशोर पाटील, चंदन पाटील, राकेश कंडारे यांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून दिपप्रज्वलन करण्यात आले. कार्यक्रमप्रसंगी आपले मनोगत व्यक्त करतांना किशोर पाटील म्हणाले की, हिंदवी स्वराज्य स्थापना करण्याचे स्वप्न प्रत्यक्षात साकारण्यासाठी मां साहेबांनी प्रेरणादायी कार्य केले व त्यांच्या या कार्यामुळे आपण आज स्वातंत्र्यं भारतात जगत आहोत.

तसेच सेवक सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष विशाल शर्मा यांनी आपले मनोगत व्यक्त करतानां सांगितले की, आजचा दिवस सन 1984 पासून राष्ट्रीय युवा दिवस म्हणून संपूर्ण भारतामधे साजरा करण्यात येतो. हिंदू धर्माचा प्रचार व शिकागो येथे सन 1893 मधे झालेल्या विश्व धर्म सम्मेलनामधे स्वामी विवेकानंद यांनी केलेले भाषण प्रेरणादायी व प्रंशसनीय आहे.

सदर कार्यक्रम प्रसंगी हिंदूत्व स्वाभिमानचे सचिव मयुर बारी, किशोर पाटील, चंदन पाटील, हेल्थ प्लस इन्स्टिट्यूटच्या भारती काळे, राकेश कंडारे, रिद्धी जानवी फाउंडेशनच्या चित्रलेखा मालपाणी इ. उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.