पाचोरा :- पाचोरा तालुक्यात शिवसेना व भाजपामधे गेल्या दोन वर्षांपासून अतीशय खालच्या पातळीवर येवुन आरोप प्रत्यारोप झाले, आमदार किशोर पाटील यांनी आयोजित केलेल्या पाणी टंचाई निवारणार्थ बैठकीस पंचायतीचे सभापती बन्सीलाल पाटील यांनी ग्रामसेवकांना उपस्तीतीत राहू न दिल्याने सेनेच्या कार्यकर्त्यांनी जाब विचारण्यासाठी पंचायत समिती गाढली असता सभापतींनी जलसंपदामंत्री ना गिरीष महाजन यांचे कान भरवून सहाय्यक गटविकास अधिकारी विलास सनेर यांना पूढे करुन व पोलिसांवर दबाव तंत्राचा वापर करून सेनेच्या प्रमुख पदाधीकाऱ्यांवर शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याचा गुन्हा दाखल केल्याने जिल्हा परिषद सदस्य पदमसिंग पाटील, शेतकरी सेनेचे जिल्हा प्रमुख अरुण पाटील, तालुका प्रमुख शरद पाटील यांना तिन महिने सब जेल मध्ये राहावे लागले. तर जि.प. सदस्य रावसाहेब पाटील, दिपकसिंग राजपुत, सह प्रमुख १२ पदाधिकाऱ्यांना ऐन दिवाळीच्या सणात तीन महिने गाव सोडून राहावे लागले. पाचोरा पंचायत समितीत काॅंग्रेसला सोबत घेऊन तर बाजार समितीत राष्ट्रवादी काँग्रेसला सोबत घेऊन भाजपाने सत्ता स्थापन केली असुन मोका मिळेल त्या ठिकाणी शिवसेनेला अपमानीत केले आहे. या सारख्या अनेक गोष्टी विसरण्या सारख्या नसल्याने बांबरूड-कुरंगी जिल्हा परिषद गटातील शिवसेनेचे सदस्य पदमसिंग रामदास पाटील हे दि. ४ रोजी जळगांव लोकसभेसाठी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.
केंद्रात व राज्यात सेना – भाजपाची युती झालेली असली तरी जिल्ह्यात जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन व आमदार किशोर पाटील यांच्यात श्रेयवादावरुन गेल्या दोन वर्षांपासून अतिशय कटुता निर्माण झाली आहे. वरिष्ठांचा भाजपाच्या उमेदवाराचे काम करण्याचा आदेश असल्याने आमदार किशोर पाटील वरिष्ठांचा आदेश पाडुन भाजपा उमेदवाराचा प्रचार ही करतील व तसा त्यांनी पत्रकार परिषदेत खुलासा ही केला आहे. मात्र दि. २८ रोजी सेनेचे सह संपर्क प्रमुख, माजी आमदार व आमदार किशोर पाटील यांचे काका आर.ओ. (तात्या) पाटील यांचे दुःखद निधन झाल्याने आमदार पाटील यांना भेटण्यासाठी जिल्हा व राज्यभरातुन अनेक नेते, सामाजिक कार्यकर्ते, नातेवाईक येत असल्याने आमदार किशोर पाटील हे घरीच थांबुन आहेत. ऐव्हाना भाजपाच्या उमेदवाचा प्रचार करण्यास सुरुवात ही केली असती. तालुक्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या भाजपाकडुन पदोपदी झालेला अपमान, जिल्हा परिषद, पंचायतीत सत्ते पासुन रोखणे, बाजार समितीत सत्तेतुन खाली खेचणे, कुऱ्हाड सारख्या मोठ्या गावातील सेनेच्या ग्रामपंचायत संचालक मंडळ बरखास्त करणे, ऐन दिवाळीच्या सणासुदी तीन महिने जेल मध्ये राहाणे यासारखा वाईट अनुभव पदाधिकारी विसरण्यास तयार नसुन दि. १ एप्रिल रोजी जळगांव येथे झालेल्या संपर्क प्रमुख संजय सावंत, सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत जिल्हा परिषद सदस्य रावसाहेब पाटील, अॅड दिनकर देवरे, पदमसिंग पाटील यांनी थेट गिरीष महाजनांवर रोष व्यक्त करुन भाजपा उमेदवाराचा प्रचार न करण्याचा चंग बांधला आहे. शिवसेना – भाजपाचे वरिष्ठ नेते, लोकप्रतिनिधी एकमेकांशी जुळवून प्रचार करतील ही. मात्र स्थानिक पदाधिकाऱ्यांची कशी समजूत काढणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असुन निवडणुक निकाला नंतरच भाजपा – सेनेच्या पदाधिकाऱ्यांचे संबंध जुळविण्यात यशस्वी झाले की नाही ? हे मत पेटीतुनच कळणार आहे.