सेक्स रॅकेटप्रकरणी शिवसेनेच्या महिला पदाधिकाऱ्याला अटक !

0

उल्हासनगर (मुंबई) : सेक्स रॅकेटप्रकरणी  शिवसेनेच्या महिला पदाधिकारी शोभा गमलाडू – पवार यांना अटक करण्यात आली आहे. कल्याणमधील एका लॉजवर छापा टाकल्यानंतर गुन्हे शाखेने ही कारवाई केली आहे. या कारवाईमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

कल्याणमधील बिर्ला कालेजनजीक असलेल्या दुर्गा पॅलेस लॉजिंग अँड बोर्डिंगमध्ये (ड्युक्स प्लाझा) कल्याणमध्ये सेक्स रॅकेट सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर गुन्हे शाखेच्या मानवी-तस्करीविरोधी पथकाने हॉटेलवर धाड टाकली. पोलिसांनी अटक केलेल्यांमध्ये लॉजचा मॅनेजर सुरेश शेट्टी,विनोदकुमार यादव आणि शिवसेनेच्या उल्हासनगरमधील महिला आघाडीच्या विभाग प्रमुख शोभा गमलाडू – पवार यांचा समावेश आहे. पोलिसांच्या कारवाईदरम्यान मुलीच्या दोन पर्स आणि ५९ हजार रुपये हस्तगत करण्यात आले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.