भुसावळ – सेंट्रल रेल्वे स्कूल मध्ये सांप्रदायिक सदभावना सप्ताह निमित्त सोमवार रोजी परिसंवादाचे आयोजन आभासी माध्यमातून करण्यात आले होते. या मध्ये विद्यालयाच्या शिक्षकांनी सहभाग घेतला होता. मनोज साळुंखे, अनिल मोरे, अजित पाठक ह्या शिक्षकांनी आपले विचार मांडले. जातीय एक्य आणि समानता देशाच्या प्रगती साठी समाजात असणे किती आवश्यक आहे त्याचे महत्व विषद केले. कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या प्रमुख पाहुण्या सुमित्रा गांगुर्डे शैक्षणिक सल्लागार आपले विचार व्यक्त केले. समता, एकता आणि बंधुत्व प्रत्येकाने आपल्या मनात हृदयात ठेवले तर समाज एकरूप होईल आणि कुठल्याही प्रकारचा भेदभाव समाजात राहणार नाही तसेच विद्यार्थी दशेतच हे रुजविले गेले तर एक नवीन समाज प्रगतिशील देश निर्माण होईल असे त्यांनी प्रतिपादन केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष एन डी गांगुर्डे सिनि डी पी ओ आपले विचार व्यक्त करतांना म्हणाले अशा प्रकारच्या सप्ताहाच्या आयोजनाने दैनंदिन व्यवहार मध्ये मनामध्ये हृदयात काही धूळ जमा झाली असेल काही गैरसमज निर्माण झाले असतील तर ते दूर होतात आणि नवीन ऊर्जा मिळून अधिक जोमाने सगळे कार्यशील होतात. आभार प्रदर्शन सतीश कुलकर्णी प्राचार्य रेल्वे स्कूल यांनी केले तर कार्यक्रमाचे सुत्र संचालन संतोष उपाध्याय यांनी केले. या कार्यक्रमात स्वाती चतुर्वेदी उप प्राचार्या, प्रीती मॅक्सवेल मुख्याध्यापिका प्राथमिक विभाग शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी आभासी माध्यमाद्वारे मोठ्या संख्येने उपस्थित होते .