नवी दिल्ली: सॅमसंगने आपल्या गॅलेक्सी A21s स्मार्टफोनची किंमत कमी केली आहे. आता हा स्मार्टफोन 2000 रुपयांनी स्वस्त झाला आहे. या फोनची सुरुवातीची किंमत १५ हजार रुपयांपेक्षा कमी झाली आहे. या फोनमध्ये ४८ मेगापिक्सलचा क्वॉड रियर कॅमेरा आणि 5000mAh ची बॅटरी दिली आहे.
सॅमसंग गॅलेक्सी A21s ची नवीन किंमत आणि वैशिष्ट्ये
गॅलेक्सी A21s मध्ये दोन प्रकार आहेत. त्याच्या 4 जीबी + 64 जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 1500 रुपयांनी कमी करण्यात आली आहे, त्यानंतर आता ते 14,999 रुपयांमध्ये खरेदी करता येईल. या व्यतिरिक्त, त्याच्या 6 जीबी + 64 जीबी इंटरनल स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 2000 रुपयांनी कमी केली गेली आहे, त्यानंतर आपण हा वेरियंट 16,499 रुपयात खरेदी करू शकता. हा स्मार्टफोन तीन कलर, ब्लॅक, व्हाईट आणि ब्लू या रंगात उपलब्ध आहे. नवीन किंमत कंपनीच्या वेबसाईटवर अपडेट केले आहेत.
फोनचे खास वैशिष्ट्ये
स्मार्टफोनमध्ये ६.५ इंचाचा एचडी प्लस डिस्प्ले ओ दिला आहे. याचे रिझॉल्यूशन 720×1600 पिक्सल्स आहे. फोनमध्ये सॅमसंगचा Exynos 850 प्रोसेसर दिला आहे. फोनमध्ये ६ जीबी पर्यंत रॅम आणि १२८ जीबी पर्यंत स्टोरेज दिला आहे. स्टोरेज मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने ५१२ जीबी पर्यंत वाढतवा येवू शकतो. फोनमध्ये 5000mAh मोठी बॅटरी दिली आहे. 15W फास्ट चार्जिंग सपोर्ट दिला आहे.
फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये चार रियर कॅमेरे दिले आहेत. यात ४८ मेगापिक्सलचा प्रायमरी, ८ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड अँगल, २ मेगापिक्सलचा डेप्थ आणि २ मेगापिक्सलचा मायक्रो सेन्सर दिला आहे. सेल्फीसाठी या फोनमध्ये १३ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे.