सुरेशदादा जैन यांच्या जन्मदिनानिमित्त गोसेवा, रक्तदान शिबीर

0

जळगाव (प्रतिनिधी)- राज्याचे माजी मंत्री तथा जळगावचे माजी आमदार सुरेशदादा जैन यांच्या ७८ व्या वाढदिवसानिमित्त शहरात श्री. जैन युवा फौंडेशन आणि युवाशक्ती फौंडेशनतर्फे गोसेवा करून रक्तदान शिबीर घेण्यात आले. पांजरपोळ संस्थान येथे गायींना लापशी व भाजीपाला खाऊ घालण्यात आली. त्यानंतर इंडियन रेडक्रॉस सोसायटी येथे रक्तदान शिबीर घेण्यात आले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून नितीन लढ्ढा, विष्णू भंगाळे, शिवसेना महानगर प्रमुख शरद तायडे,डॉ. प्रसन्नकुमार रेदासनी, जितेंद्र मुंदडा, श्री जैन युवा फौंडेशनचे अध्यक्ष जयेश ललवाणी,  सचिव रितेश पगारिया विराज कावड़िया आदी उपस्थित होते. यावेळी  नितीन लढ्ढा, विष्णू भंगाळे या माजी महापौरांनी सुरेशदादा जैन यांच्याविषयी गौरवोद्गार काढून त्यांच्या कार्याची प्रशंसा केली. रक्तदान शिबिरात ७८ बाटल्या रक्त जमा झाले. शिबिराला उपाध्यक्ष आनंद चांदीवाल,कोषाध्यक्ष अमोल फुलफगर , कार्याध्यक्ष पियुष संघवी, सहसचिव पारस कुचेरिया, प्रतीक कावडीया, प्रवीण छाजेड,  प्रकल्प प्रमुख प्रणव मेहेता, सुशील छाजेड व मनोज लोढा, प्रविण पगारिया, प्रितेश चोरडिया,दर्शन टाटिया,अनीश चांदीवाल, सौरभ कोठारी ,संदीप सुराणा,आशीष कांकरिया, गौरव पानगरिया,धीरज बेदमुथा, यांच्यासह युवाशक्ती फौंडेशनचे,अमित जगताप, पियुष हसवाल, उमाकांत जाधव आदी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.