सुरेशदादा जैन यांचे कट्टर समर्थक आण्णा भापसेंचा राष्ट्रवादीत प्रवेश

0

जळगाव :– शिवसेनेचे व सुरेशदादा जैन यांचे कट्टर समर्थक माजी नगरसेवक आण्णा भापसे यांनी आज राष्ट्रवादीत प्रवेश केला. जळगाव येथील आयोजित राष्ट्रवादीच्या मेळाव्यात प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या उपस्थितीत त्यांनी हा प्रवेश केला. यावेळी जळगाव लोकसभेचे उमेदवार गुलाबराव देवकर, आमदार सतिष पाटील, विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुणभाई गुजराथी आदी उपस्थितीत होते.

महापालिकेत खानदेश विकास आघाडी व शिवसेनेचे नेते माजी मंत्री सुरेशदादा जैन यांचे कट्टर समर्थ म्हणून आण्णा भापसे ओळखले जातात. इतकेच नाही, तर नऊ महिन्यांपुर्वी झालेल्या महापालिकेच्या निवडणुकीत आण्णा भापसे यांच्या पत्नी शिवसेना पुरस्कृत म्हणून निवडून आल्या आहेत. भापसे यांनी आजच्या राष्ट्रवादीच्या मेळाव्यात कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यामुळे आता जळगाव जिल्ह्यात देखील राजकीय घडामोडी वाढल्या असून मतांच्या गणित जुळवण्यासाठी राजकीय नेते व पक्षातर्फे दुसर्‍या पक्षातील नाराज गटाला आपल्याकडे ओढण्याची चढाओढ निर्माण झाली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.