बोदवड – तालुक्यातील मुक्तळ व सुरवाडा रस्त्यावरील नियतक्षेत्र ५०४ मध्ये लागलेल्या आगीत मोठ्या प्रमाणात वनसंपदेची हानी झाली आहे.रसत्याच्या दुतर्फावरील गवत पेटविल्यानंतर या आगीचा भडका उडत त्याचे वणव्यात रुपांतर झाले.ग्रामस्थांनी संबधित वनपाल गवळी व वनरक्षक बेलदार यांच्याशी संपर्क साधत आगीची माहिती दिली.
यावेळी वनविभागाच्या कर्मचा-यांनी तात्काळ परिसराला भेट न दिल्यामूळे आगीने उग्ररुप धारण केल्याने जंगलातील संपुर्ण वनसंपदा नष्ट होत निसर्गाचे मोठ्या प्रमाणात हानी झाली आहे.सुरवाडा नियतक्षेत्र ५०४ मध्ये लागलेली आग ही नैसर्गिक नसून अनैसर्गिक स्वरुपाची मानवनिर्मित असून हि आग वनविभागाच्या कर्मचा-यांच्या हलगर्जीपणामूळे लागली असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.ग्रामस्थ यांच्या साहाय्याने आग विझवल्याचा दावा वनरक्षक व वनपाल यांनी केला आहे.परंतू,हा दावा ग्रामस्थांनी फेटाळून लावला आहे.वनरक्षकांनी पोलिस निरीक्षकांना दिलेल्या खबरीत १२:३० वाजेच्या सुमारास आग लागल्याचे नमूद आहे.तर वनपालांना दिलेल्या वन अपराध पहिल्या परिवृत्तात हि आग १:२० ला लागल्याचा दावा आहे. सदरील जंगलात लागलेल्या आगीबाबत वन विभाग संभ्रमावस्थेत दिसून येत आहे. लागलेल्या आगीत अंदाजे ०८ हेक्टर क्षेत्रात लागलेल्या आगीत गवत,रानझेंडू,आराटी,रानतूळस, पालापाचोळा,जळीत झाल्यामूळे ८०० रुपये नुकसानीची नोंद करण्यात आली असली तरी यांत जळालेल्या वृक्षांचा उल्लेख नसल्याने वन विभागाची पाहणी डोळे झाकून झाली असल्याची टिका ग्रामस्थांकडून होत आहे.
सदरील घटनास्थळी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रा.हितेश पाटिल यांनी आग लागल्याच्या दुस-या दिवशी भेट देत जंगलात झाडे जळत असल्याचा प्रकार निदर्शनास आला.वणवा विझवण्यासाठी वन विभागाकडून कोणत्याही प्रकारची उपाययोजना केल्याचे दिसले नाही.यावेळी प्रा. हितेशदादा पाटील यांनी आमदार चंद्रकांत पाटिल यांना व्हिडिओ संपर्क साधत सदरील घटनेची माहिती दिली.सदरील प्रकरणाचा सोशल मिडियावर आवाज उठवल्या गेल्याने झोपलेला वन विभाग खळबळून जागे झाला. यावेळी वनक्षेत्रपाल बच्छाव यांनी दिनांक १६ रोजी सायंकाळच्या सुमारास भेट दिली.आमदार चंद्रकांत पाटिल व जिल्हा वन अधिकारी घटनास्थळी भेट देणार आहेत.
याप्रकरणाचा वन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याशी संपर्क साधत जिल्ह्यातील वनविभागाचा गलथान कारभार युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रा.हितेश पाटील यांनी त्यांच्या निदर्शनात आणून दिला.
दिनांक १४ रोजी मुक्तळ ते सुरवाडा रसत्यांच्या दुतर्फा असलेला कचरा वनरक्षक डी.ए.बेलदार व वनपाल ललित गवळे यांनी स्वतःहजर न राहता मजूरांच्या मार्फत पेटवल्यावर ते सदरील ठिकाणावरुन निघून गेले. संपुर्ण आग विझवल्यानंतर वनरक्षक व वनपाल येथून जाणे गरजेचे नसतांना ते येथून निघून गेल्यावर काही तासांत वा-याच्या साहाय्याने हि आग जंगलात घुसुन तिने उग्ररुप धारण केल्याचे सुरवाडा येथील गावक-यांना दिसले असता,सायंकाळच्या ५ वाजेच्या सुमारास ग्रामस्थ घटनास्थळी गेले.यावेळात आगेने उग्ररुप धारण केल्यामूळे ग्रामस्थांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला.यावेळी सदरील परिसरात वनरक्षक व वनपाल गैरहजर होते.वनरक्षक व वनपाल यांना गावक-यांनी संपर्क साधत याप्रकाराची माहिती दिली. यावेळी तातडीने घटनास्थळी वनपाल व वनरक्षक यांनी भेट देऊन उपाययोजना करणे गरजेचे असतांना संबंधित कर्मचारी हे आग लागल्याच्या दुस-या दिवशी घटनास्थळी पोहोचले.सदरील वनरक्षक व वनपाल यांच्या हलगर्जीपणामूळे मोठ्या प्रमाणात वनसंपदेचे नुकसान झाले असून यांत वन्य पक्षांचा मृत्यू झाला आहे.वनरक्षक व वनपाल हे मुख्यालयी राहत नाहीत.वन विभागाकडून पुर्णपणे गवत न कापल्या गेल्याने आगीचा भडका उडाला.त्यामूळे ९० % झाडे जळाले आहेत.मुख्यालयी राहतच नसलेल्या वनविभागाच्या कर्मचा-यांना आगीचा पत्ताच नसल्याने या प्रकरणाची तातडीने चौकशी करुन कर्तव्यात कसूर केलेल्या वनपाल व वनरक्षकावर निलंबनाची तथा उचित प्रशासकिय कारवाई करण्याची मागणी जिल्हाधिकारी यांच्याकडे युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रा.हितेश पाटिल यांनी केली आहे.
युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रा.हितेश पाटील,मानमोडीचे सरपंच मोहन पाटील,मुक्तळचे सरपंच जितू पाटील,सुरवाडा उपसरपंच निलेश शिंदे,मानमोडी उपसरपंच विशाल इंगळे,गजानन पाटील,उमेश बिजागरे,निलेश जवरे,पुंडलिक मुसळे,युवासेना तालूका समन्वयक अमोल व्यवहारे यांच्यासमवेत आदि जण उपस्थित होते.