सुभाष चोप्रा यांचा दिल्ली काँग्रेस अध्यक्षांचा राजीनामा

0

नवी दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा एकही उमेदवार विजयाकडे जाऊ न शकल्याने दिल्ली काँग्रेसचे अध्यक्ष सुभाष चोप्रा यांनी पदाचा राजीनामा सोपवला आहे. आता यावर पक्षाच्या हायकमांडकडून निर्णय घेतला जाईल, अशी माहिती सुभाष चोप्रा यांनी दिली आहे.


“मी दिल्ली विधानसभा निवडणुकीतील काँग्रेसच्या पराभवाची जबाबदारी स्वीकरत आहे. माझ्याकडे कमी वेळ होता. मात्र तरी देखील मी सर्वोतोपरी प्रयत्न केले. मी दिल्लीत कधीच अशाप्रकारचे राजकारण पाहिले नाही, जिथं मतदार आम आदमी पार्टीकडून करण्यात आलेल्या जाहीरताबाजीने प्रभावित झाले व त्यांना मतदान केलं.” असं सुभाष चोप्रा यांनी सांगितलं आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.