सुप्रिम कॉलनीत दोन गटात तुंबळ हाणामारी, सात जणांवर गुन्हा दाखल

0

जळगाव | प्रतिनिधी 

शहरातील सुप्रीम कॉलनी याभागात नळाचे पाणी भरतांना हटकणे आणि दारूच्या नशेत शिवीगाळ केल्या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात परस्परविरोधात सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरती गोपाल राठोड रा. सुप्रिम कॉलनी यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, ६ ऑगस्ट रोजी रात्री १०.३० वाजेच्या सुमारास आरती राठोड ह्या गायीच्या वासराला चारा टाकण्यासाठी जात असतांना सिताराम राठोड (पुर्ण नाव माहित नाही) हा दारूच्या नशेत शिवीगाळ करून हात मुरगळला होता. तर सिताराम राठोडच मुलगा आणि एक अनोळखी मुलगा यांनी हातातील लोखंडी पाईपने डोक्यावर मारून गंभीर दुखापत केली. तर विवाहितेच्या सासूला देखील मारहाण केली. आरती राठोड यांच्या फिर्यादीवरून तीन जणांविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात शनिवारी रात्री १२.३० वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ संजय धनगर करीत आहे.

दुसऱ्या फिर्यादीत सुरेखा सिताराम चव्हाण रा. सुप्रिम कॉलनी यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, फिर्यादी ह्या नळाचे पाणी भरत असतांना गोविंदा भज्जी राठोड याने शिवीगाळ केली. तसेच गोपी भज्जी राठोड, सखुबाई भज्जी राठोड आणि सोनू (पुर्ण नाव माहित नाही) सर्व रा. सुप्रिम कॉलनी यांनी सुरेख चव्हाण यांना बेदम मारहाण केली. सुरेखा चव्हाण यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीसात चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ महेंद्र सिंग पाटीलकरीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.