सुप्रसिद्ध गायिका कडुताई खरात यांचे पाचोरा नगरीत जंगी स्वागत

0

पाचोरा (प्रतिनिधी) : “आम्ही खातो त्या भाकरीवर बाबासाहेबांची सही आहे र” अशा भीम गीतांच्या सुप्रसिद्ध गायिका तसेच समाज प्रबोधन करणाऱ्या कडुताई खरात रा. आव्हाना ह. मु. औरंगाबाद यांचे राष्ट्रीय चर्मकार महासंघ, बहुजन समाज, आर. पी. आय., भीम प्रेमी, शिव प्रेमी, संत शिरोमणी रविदास महाराज प्रेमी यांचे तर्फे जंगी स्वागत करण्यात आले. कडुताई खरात ह्या दि. २१ रोजी औरंगाबाद हुन धुळे येथे जात असतांना त्यांनी पाचोरा नगरीत धावती भेट दिली.

यावेळी पुष्पगुच्छ, साडी, चोळी देवुन त्यांचे राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे तालुकाध्यक्ष गोवर्धन जाधव यांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकातील गोवर्धन शुज सेंटर येथे जंगी स्वागत केले. याप्रसंगी पिपल्स रिपब्लिकन पार्टी (कवाडे गट) जिल्हा उपाध्यक्ष खंडु सोनवणे, आर. पी. आय. चे तालुका अध्यक्ष विनोद अहिरे, पत्रकार प्रविण ब्राम्हणे, विकास थोरात सह भीम प्रेमी, शिव प्रेमी, आर. पी. आय., बहुजन समाजाचे पदाधिकारी उपस्थित होते. सत्कार स्विकारल्यानंतर कडुताई खरात यांनी गोवर्धन जाधव यांचे सह उपस्थितांचे आभार मानले. व सायंकाळी ५ वाजता कडुताई खरात ह्या धुळेच्या दिशेने मार्गस्थ झाल्या.

Leave A Reply

Your email address will not be published.