सुपर ओव्हरमध्ये भारताचा विजय !

0

हॅमिल्टन: भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील तिसऱ्या टी-२० सामना हॅमिल्टन येथील सेडन पार्कवर खेळला गेला. दरम्यान, यावेळी सामन्यात सुपर ओव्हर झाली. या सुपर ओव्हारमध्ये भारताने विजय मिळविला आहे. भारतीय संघाने ५ सामन्यांच्या मालिकेत ३-० अशी आघाडी घेत मालिका जिंकली.

सुपर ओव्हरमध्ये प्रथम न्यूझीलंडने फलंदाजी केली. त्यांनी बिनबाद 17 धावा केल्या. न्यूझीलंडकडून केन विलियम्सनने 11 आणि मार्टिन गप्टिलने 5 धावा केल्या. या सुपर ओव्हरमध्ये भारताकडून वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने गोलंदाजी केली. त्यानंतर फलंदाजीसाठी उतरलेल्या भारताला 18 धावांचे आव्हान होते. भारताकडून रोहित शर्मा आणि केएल राहुलने फलंदाजी केली. यावेळी भारताने पहिल्या 4 चेंडूत 8 धावा केल्या होत्या. त्यामुळे भारताला शेवटच्या 2 चेंडूत 10 धावांची गरज होती. पण अखेरच्या चेंडूवर विजयासाठी चार धावांची गरज असताना रोहित शर्माने षटकार लगावून विजय मिळविला. याविजयासह भारताने मालिका जिकली आहे.

तत्पूर्वी या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 20 षटकात 5 बाद 179 धावा केल्या होत्या आणि 180 धावांचे आव्हान न्यूझीलंडला दिले होते. भारताकडून रोहित शर्माने 65 धावांची अर्धशतकी खेळी केली. तर विराट कोहलीने 38 धावांची छोटेखानी खेळी केली. न्यूझीलंडकडून हमिश बेनेटने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. भारताने दिलेल्या १८० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना न्यूझीलंडनेही निर्धारित २० षटकांत १७९ धावाच केल्या.

Leave A Reply

Your email address will not be published.