Sunday, May 29, 2022

“सुना है मेरे घर सरकारी मेहमान आने वाले है”; मलिकांच्या ट्विटने चर्चांना उधाण

spot_imgspot_img
- Advertisement -
- Advertisement -

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क 

- Advertisement -

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक आणि एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यात रोज नवनवीन आरोप प्रत्यारोप होतांना होतांना दिसतात. मलिक यांनी वानखेडेंवर  टीका केल्याप्रकरणी हायकोर्टाची माफी मागणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांचं एक ट्विट सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

- Advertisement -

माझ्या घरी आज उद्या सरकारी पाहुणे येणार असल्याचं कळतंय. त्यांचं स्वागत आहे, असं मलिक यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

राष्ट्रवादीचे नेते आणि अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी काल रात्री एक ट्विट केलं. ‘मित्रांनो, माझ्या घरी आज उद्या सरकारी पाहुणे येणार असल्याचं ऐकलंय. आम्ही त्यांचं स्वागत करतो. घाबरणं म्हणजे रोज रोज मरणं. आम्ही घाबरणार नाही. लढणार आहोत. गांधी गोऱ्यांशी लढले होते. आम्ही चोरांशी लढणार आहोत,’ असं मलिक यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

मलिक यांच्या ट्विटनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं. मलिक यांच्या केंद्रीय तपास यंत्रणा धाडी टाकणार आहेत का, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. याआधी ऑक्टोबरमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या निकटवर्तीयांच्या घरावर, कार्यालयांवर आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी छापे टाकले होते. त्यावेळी शरद पवारांना विचारलं असता, सरकारी पाहुणे येऊन गेले. त्यांची भीती वाटत नाही, अशी प्रतिक्रिया दिली होती. त्यानंतर आता मलिक यांनी त्यांच्या ट्विटमध्ये सरकारी पाहुण्यांचा उल्लेख केल्यानं चर्चा रंगू लागल्या आहेत.

 

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या