सुनसगाव ग्रामपंचायत पोटनिवडणुकीत ज्योती पाटील विजयी

0

भुसावळ :-तालुक्यातील सुनसगाव ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीत ज्योती युवराज पाटील या 388 मते मिळवू विजयी झाल्यातर प्रतिस्पर्धी दीपाली हर्षल भोळे यांना 187 मते मिळाली. सुनसगाव येथील नामाप्र महिला राखीव जागेसाठी वार्ड क्रमांक दोनसाठी रविवारी निवडणूक झाली. 895 पैकी 593 मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला. एका जागेसाठी झालेल्या चुरशीच्या निवडणूकीत 65 टक्के मतदान झाले. सोमवारी सकाळी 9 वाजेच्या दरम्यान तहसील कार्यालयात मतमोजणी प्रक्रीया पार पडली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून एस.जे.इंगळे होते.

Leave A Reply

Your email address will not be published.