सुधारगृहातून पळालेल्या मुलाला एलसीबीने मुलाला चाेपड्यातून घेतले ताब्यात

0

जळगाव प्रतिनिधी | मध्य प्रदेशातील बालसुधारगृहात असताना पोट दुखत असल्याचा बहाणा करून पळून गेलेल्या घरफोडी व दुचाकी चोरी करणाऱ्या अल्पवयीन मुलाला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने चोपडा शहरातून ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून चोरीची दुचाकी हस्तगत करण्यात आली असून, त्याला जळगाव बालसुधारगृहात दाखल करण्यात आले आहे.

मध्य प्रदेश राज्यातील बालसुधारगृहातून अल्पवयीन मुलगा पळून गेलेला आहे.

तो पळून गेल्याबाबत मध्य प्रदेशातील कोतवाली झाबुवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. तो चोपडा शहरात वास्तव्यास असून, जळगाव जिल्ह्यात घरफोडी व दुचाकी चोरीसारखे गुन्हे करीत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती. त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पथक त्या अल्पवयीन मुलाच्या शोधासाठी चोपडा येथे गेलेले होते. पथकाने त्याला चोपडा येथून ताब्यात घेतले. त्याच्याजवळ धरणगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीतून चोरीला गेलेली दुचाकी आढळून आली. त्याची अधिक विचारपूस केल्यानंतर एरंडोल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असलेली चोरीची दुचाकीही आढळून आली. शिरपूर येथून दुचाकी व धुळे येथे दुचाकी व घरफोडी केल्याचेही त्याने सांगितले. त्या अल्पवयीन मुलास जळगाव बालसुधारगृहात रवाना केले असून, तो मध्य प्रदेशातील बालसुधारगृहात असताना बहाणा करून पळून गेलेला होता. त्यावेळी तेथील पोलिस अधीक्षकांनी दोन पोलिस कर्मचाऱ्यांना निलंबित केले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.