भडगाव- सागर महाजन
कोरोना मुळे सर्वत्र लॉक डाऊन झाल्याने सुट्टीवर आलेल्या सैन्यदलातील पोलिस कर्मचाऱ्याला रेल्वे सेवा बंद असल्याने आपल्या मुख्यालय येथे जाता येत नसल्याने त्यांनी या कालावधी भडगाव येथे विनामोबदला कार्य करून या द्वारे देशसेवेचे कार्य सुरूच ठेवणार आहेत.
शहरातील उज्वल कॉलनीतील रहिवासी योगेश महाजन हे सैन्यदलात सेना पोलिस या पदावर कार्यरत असून लॉक डाऊन च्या अगोदर सुट्टी घेऊन काही दिवसांसाठी कुटुंबासोबत वेळ घालवण्यासाठी गावाकडे आले या नंतर सुट्टीची मुदत संपली. या कालावधीतच कोरोणा चा प्रादुर्भाव वाढला आणि लॉक डाऊन वाढल्याने रेल्वे सेवा बंद झाल्या. यामुळे योगेश महाजन यांना आपल्या कर्तव्य वर जाता येत नसून घरी बसून देशसेवेचे कार्य मनात असताना घरात स्वस्थ बसू देत नव्हते म्हणून त्यांनी भडगाव पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक धनंजय येरुळे यांना निवेदन दिले की मला विना मोबदला गस्त घालण्याची परवानगी द्यावी असे निवेदन दिल्यानंतर सलग तीन दिवसापासून भडगाव शहरात आपली चोख सेवा बजावत आहे. योगेश महाजन यांनी दाखवून दिले की सीमेवर राहूनच देश सेवा करता येत नाही तर अन्य प्रकरेही देश सेवा करता येते.मनात जर देश सेवा करायचे ठरविले तर प्रत्येक नागरिक कोणत्याही प्रकारे देश सेवा करू शकतो.योगेश महाजन यांच्या सारखा प्रत्येक नागरिकाने विचार केला तर आपण लवकरच कोरोनावर मात करू शकतो.