मॉस्को : कोरोनावर मात करण्यासाठी गेल्या महिन्यात विकसित केलेली रशियाची ‘स्पुटनिक-व्ही’ ही लस प्रभावी आणि सुरक्षित असल्याचे समोर आले आहे. लॅन्सेट या नियतकालिकांत प्रकाशित संशोधनात हा दावा करण्यात आला आहे.
चाचणीच्या पहिल्या दोन टप्प्यात रशियाची ‘स्पुटनिक व्ही’ ही लस सुरक्षित असल्याचे आढळले. ‘स्पुटनिक व्ही’लस टोचल्यानंतर ४२ दिवसांनंतरही कोणतेही अन्य गंभीर परिणाम (साइड इफे क्ट्स) जाणवले नाहीत. त्याचप्रमाणे ही लस २१ दिवसांत शरीरामध्ये अॅण्टिबॉडी तयार करण्यास सक्षम आहे.
अशी आहे लस
या लसीत ह्युमन अॅडेनो व्हायरस २६ व ह्युमन अॅडेनो व्हायरस टाइप ५ (आरएडी ५- एस) यांचा समावेश आहे. संशोधकांनुसार, अॅडेनोमुळे सामान्यत: सर्दी होते. विषाणूंना मानवी पेशींची प्रतिकृती तयार करता येऊ नये व रोग निर्माण करणे शक्य होऊ नये यासाठी या लसीत त्यावर मात करण्याचा उपाय आहे.